आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमुळे वारकऱ्याचे वाचले प्राण

मुंबई: आषाढी वारीसाठी नांदेडहून आलेले वारकरी बालाजी संगेकर (वय 75) यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. वारीदरम्यान तब्येत खालावल्याने तातडीने त्यांना पंढरपूर येथील डॉ.काने हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आणि तातडीने अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.

    उपचाराचा खर्च मोठा असल्याने संगेकर यांना एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत ETI (Emergency Tertiary Intervention) सेवा मिळाल्यामुळे संपूर्ण उपचार मोफत करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक बोजा न पडता वेळेवर उपचार मिळाले आणि त्यांचे प्राण वाचवता आले. महाराष्ट्र शासनाने सर्वांना मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी एकत्रित योजना राबवली आहे. या योजनेतून शासकीय व खासगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतो. या योजनेमुळे 1356 आजारांवर उपचार करण्यात येत असून आपत्कालीन सेवा (ETI) अंतर्गत तातडीचा लाभ मिळतो. त्याचबरोबर राज्यभरातील 2000 हून अधिक अंगीकृत खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये ही सेवा मिळते.

 

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

पुण्यात डॉक्टरच करत होता ड्रग्सची तस्करी...तब्बल 15 लाखांचे मेफेड्रोन केले जप्त

Latest News

पुण्यात डॉक्टरच करत होता ड्रग्सची तस्करी...तब्बल 15 लाखांचे मेफेड्रोन केले जप्त पुण्यात डॉक्टरच करत होता ड्रग्सची तस्करी...तब्बल 15 लाखांचे मेफेड्रोन केले जप्त
      पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे त्यातच पुण्यातील बिबवेवाडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात
ग्रामविकास मंत्र्यांच्या तालुक्यातच बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ; कुळकजाई घाटात साईटपट्ट्या न भरल्यामुळे घाट बनला मृत्यूचा सापळा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयात पहिली अत्याधुनिक कृत्रिम सांधरोपण शस्त्रक्रिया यशस्वी
बँकांनी आर्थिक साक्षरता मेळावे आयोजित करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
प्रशासकीय यंत्रणांद्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती  अत्याचार प्रतिबंध अधिनियमाची  प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक - मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software