- Hindi News
- पुणे
- करोना काळात बंद पडलेला 'ग्लोबल पुलोत्सव' पुन्हा सुरु
करोना काळात बंद पडलेला 'ग्लोबल पुलोत्सव' पुन्हा सुरु

सुनीताबाई आणि भाईंचे सहजीवन चिकित्सक तरीही परस्परपूरक -परिसंवादात मान्यवरांची भावना
पुणेः ‘आहे मनोहर तरी‘ या प्रस्तकाद्वारे सुनिताबाईनी भाई आणि त्यांच्या सहजीवनाचा चिकित्सक प्रवास उलगडला असला तरी सुनीताबाई आणि भाईंचे ५४ वर्षांचे सहजीवन हे आदर्श, चिकित्सक आणि तरीही परस्परपूरक असेच होते, अशा भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज व्यक्त केल्या. पुलंचा २५ वा स्मृतिदिन व सुनीताबाईंच्या जन्मदिनाचे औचित्य साधून, करोना काळात बंद पडलेला 'ग्लोबल पुलोत्सव' पुन्हा सुरु झाला आहे. या 'ग्लोबल पुलोत्सवा' निमित्त आज बालगंधर्व कलादालन येथे आयोजित ‘सर्जनशील सहजीवन : पु. ल. आणि सुनिताबाई’ या विषयावरील परिसंवादात दिनेश ठाकूर, डॉ. मंदार परांजपे, सतीश पाकणीकर सहभागी झाले होते. त्यांच्याशी मंगला गोडबोले यांनी संवाद साधला. यावेळी महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार उपस्थित होते. 'कोहिनूर' प्रस्तुत व 'लोकमान्य मल्टी पर्पज को ऑप सो. लि'. आयोजित या महोत्सवाचे सह- प्रयोजक 'बेलवलकर सांस्कृतिक मंच', 'लोकमान्य कल्चरल फौंडेशन' व 'प्रथमेश कन्स्ट्रक्शन' आहेत. या महोत्सवास 'NFDC - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालंय', 'कार्टूनिस्ट कंबाइन' व 'महाराष्ट्र साहित्य परिषद' यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. यावेळी बोलताना डॉ. मंदार परांजपे म्हणाले की, सुनिताबाई पुलंवर 'बॉसिंग' करायच्या असा एक सर्वसाधारण सूर ऐकू येतो. ते काही अंशी सत्य असले तरी, त्या बॉसिंगवर सुनिताबाईंचे 'एम्बॉसिंग' अर्थात एक सुरेख छाप असायची. बाबा आमटे यांच्या आनंदवनात गेल्यानंतर तेथील दृष्टिहीन मुलांनी गुलाबाच्या फुलाला हात लावल्यावर काटे टोचून रक्त यायचे. यामुळे हे दांपत्य दुःखी झाले. त्यावेळी आनंदवनात बीन काट्याच्या गुलाबाचे रोप लावण्यासाठी जंगजंग पछाडलेल्या याच सुनिताबाईच होत्या. रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमध्ये त्यांना बिनकाट्याचा गुलाब मिळाला, तेव्हा हे दोघे निश्चिंत झाले. कोणत्याही नाट्य प्रयोगानिमित्त बाहेरगावी जाताना, ''काहीही विसरू नको'', अशा सूचना सुनीताबाई पुलंना आवर्जुन द्यायच्या. याला अपवाद फक्त आनंदवनाचा होता. कारण आनंदवनात गेल्यानंतर भाई स्वतःलाच विसरून जायचे.

यावेळी महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी प्रास्ताविक केले, तर सतीश जकातदार यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले. रसिकांनी घेतला चित्रपटाचा आनंद 'ग्लोबल पुलोत्सवा' निमित्त आज दुपारी एन.एफ.ए.आय. येथे लोकमान्य सिल्व्हर विंडो क्लब प्रस्तुत पुलंना भावलेल्या चित्रपटांच्या विशेष महोत्सवात पुलंनी ज्या चित्रपटावर प्रभावित होवून 'सुंदर मी होणार' हे नाटक लिहिले तो 'द बॅरेट ऑफ विंपॉल स्ट्रीट' हा चित्रपट दाखविण्यात आला. रसिकांनी या चित्रपट प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद देत त्याचा आनंद घेतला.

खबरें और भी हैं
एअर इंडियाच्या विमानाचा उड्डाण घेताच अपघात
सेतू कार्यालयातील सर्व्हर डाउनमुळे नागरिक संतप्त
नऱ्हे येथे एका सराईताने पेटवल्या 7 गाड्या
पर्यटनस्थळ परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
