- Hindi News
- पुणे
- विद्यावाणी कम्युनिटी रेडिओच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
विद्यावाणी कम्युनिटी रेडिओच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी कम्युनिटी रेडिओच्या स्थापनेला दिनांक 11 जून 2025 रोजी 20 वर्षे पूर्ण झाली. या निमित्त मा. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रा-कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि वित्त व लेखाधिकारी डॉ. चारुशीला गायके तसेच विविध मान्यवर प्राध्यापक अधिकारी शुभेच्छा दिल्या आहेत.गेल्या वीस वर्षांत विद्यावाणीने कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान -तंत्रज्ञान, समाजकारण, संस्कृती इत्यादी अनेक विषयांवर समुदायाच्या सहभागाने शेकडो कार्यक्रम मालिका प्रसारित केल्या आहेत.

या विशेष उल्लेखनीय कार्यांची दखल घेत भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने विद्यावाणी रेडिओला 'लीड कम्युनिटी रेडिओ' म्हणून प्रमाणित केले आहे.विद्यावणीच्या या यशामध्ये संकल्पक डॉ. के. आर. सानप , प्रथम संचालिका श्रीमती उष:प्रभा पागे, तसेच यापूर्वीचे संचालक आनंद देशमुख यांचा मोठा वाटा राहिला आहे. यंदाच्या वर्षी वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यापीठात कार्यरत कर्मचारी आणि निवडक विद्यार्थ्यांसाठी व्हॉइस कल्चर कार्यशाळा घेण्यात येत आहे.
त्याचबरोबर महिला मुक्ती चळवळीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक कार्यक्रम मालिका सुरू करण्यात येत आहे. या कार्यक्रमालिकेच्या पहिल्या भागाचे रेकॉर्डिंग नुकतेच पूर्ण करण्यात आले. यामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती माननीय डॉ. नीलम गोऱ्हे यांची एक अभ्यासपूर्ण मुलाखत ध्वनीमुद्रित करण्यात आली. यामध्ये स्त्रीमुक्ती चळवळीच्या पहिल्या पाच दशकातील विविध घडामोडींचा आढावा घेण्यात आला. सुप्रसिद्ध लेखिका कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी त्यांची मुलाखत घेतली आहे. नजीकच्या भविष्यात विद्यावाणी रेडिओ वरून अधिकाधिक लोकांच्या सहभागाने पुणे परिसरातील श्रोत्यांच्या नागरी व सामाजिक समस्यांची उकल करणारे प्रबोधनपर कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रभारी संचालक श्रीदत्त गायकवाड यांनी नमूद केले.

खबरें और भी हैं
एअर इंडियाच्या विमानाचा उड्डाण घेताच अपघात
सेतू कार्यालयातील सर्व्हर डाउनमुळे नागरिक संतप्त
नऱ्हे येथे एका सराईताने पेटवल्या 7 गाड्या
पर्यटनस्थळ परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
