- Hindi News
- क्रीड़ा
- राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सवर मिळवला दमदार विजय
राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सवर मिळवला दमदार विजय

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानच्या संघाने पंजाब किंग्सवर दमदार विजय मिळवला. संजू आणि यशस्वी जयस्वाल यांनी धडेकाबाज सलामी दिली. त्यामुळेच राजस्थानच्या संघाला २०५ धावांचा डोंगर उभारता आला. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला पंजाबने सुरुवातीलाच धक्के दिले होते. त्यामुळे त्यांना या सामन्यात वर्चस्व राखता आले. राजस्थानचा हा या हंगामातील दुसरा विजय ठरला, तर पंजाबच्या संघाचा हा पहिलाच पराभव ठरला आहे. राजस्थानने या सामन्यात पंजाब किंग्सवर ५० धावांनी विजय साकारला.
राजस्थानच्या २०६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाला सुरुवातीलाच धक्के बसले. त्यामुळे त्यांची अवस्था ४ बाद ४३ अशी झाली होती. पण त्यानंतर नेहार वधेरा आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी दणदणीत फटकेबाजी करत संघाचे आव्हान जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण दोन चेंडूंमध्ये हे दोघेही बाद झाले आणि पंजाबच्या हातून सामना निसटला. वधेराने यावेळी ४१ चेंडूंत ४ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ६२ धावा केल्या, तर मॅक्सवेलने २१ चेंडूंत ३० धावा केल्या.
संजू सॅमसनला कर्णधार झाल्यावर चांगलाच सूर गवसल्याचे पाहायला मिळाले. कारण संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनीही पंजाबच्या गोलंदाजीचा गोलंदाजीचा चांगलता समाचार घेतला. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये एकही विकेट पंजाबला मिळवू दिली नाही. पहिल्या १० षटकांत या दोघांनी धडाकेबाज फटकेबाजी केली आणि राजस्थानच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. संजू सॅमसन ११ व्या षटकात मोठा फटका मारण्यासाठी गेला आणि बाद झाला. त्यामुळी ही जोडी फुटली. संजूने यावेळी २६ चेंडूंत सहा चौकारांच्या जोरावर ३८ धावांची दमदार खेळी साकारली. संजू बाद झाला तरी यशस्वी मात्र गोलंदाजीवर जोरदार हल्लाबोल करत होता.
यशस्वीने यावेळी आपले अर्धशतक पूर्ण करताना राजस्थानच्या संघाची धावगती चांगलीच वाढवली. अर्धशतकानंतर तो शतकाच्या दिशेने कूच करत होता. पण यशस्वीला यावेळी शतकापासून वंचित राहावे लागले. यशस्वीने यावेळी ४५ चेंडूंत ३ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ६७ धावांची तुफानी खेळी साकारली. यशस्वी बाद झाला आणि त्यानंतर रायन परागने पंजाबच्या गोलंदाजीचा समाचार घ्यायला सुरुवात केली. परागने यावेळी २५ चेंडूत प्रत्येकी तीन चौकार आणि षटकारांच्या जोरावर नाबाद ४३ धावांची खेळी साकारली. राजस्थानच्या या तीन फलंदजांच्या धमाकेदार खेळीमुळेच त्यांना प्रथम फलंदाजी करताना २०५ धावांचा डोंगर उभारता आला.

खबरें और भी हैं
किसन वीर'चे गळित हंगाम २०२४-२५ चे ऊस बील आदा
खंबाटकी घाटात ट्रक बंद पडल्याने ट्राफिक जाम
