आरसीबीची विजयी सलामी; गतविजेत्या केकेआरचा केला पराभव 

कोलकत्ता : 2025च्या आयपीएल स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट राईडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु यांच्यामध्ये झाला. या सामन्यात आरसीबीने जबरदस्त कामगिरी करत दणदणीत विजय मिळवला. केकेआरने दिलेल्या 175 धावांचे आव्हान आरसीबीच्या संघाने 16 व्या षटकामध्ये  पूर्ण केले. या सामन्यात विराट कोहलीने धमाकेदार नाबाद 59 धावांची अर्धशतकी खेळी करत आरसीबीच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. 

     केकेआरने दिलेल्या 175 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आरसीबीच्या सलामी जोडीने आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी 8.3 षटकांत 95 धावांची मॅच विनिंग भागीदारी केली. पण 95 धावांवर फिलीप साल्टच्या रुपाने संघाला पहिला धक्का बसला. यानंतर विराट कोहली (59 धावा) आणि कर्णधार रजत पाटीदार (34 धावा) यांनी संघाला सावरले. शेवटी 16.2 षटकात विराट कोहली आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी संघाला विजय मिळवून दिला. हंगामच्या पहिल्याच सामन्यात आरसीबाने एकहाती विजय मिळवला. या सामन्यात आरसीबीची अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. 

    गोलंदाजांकडून प्रथम गोलंदाजी करताना केकेआर सारख्या बलाढ्य संघाला 175 धावांत रोखले, गोलंदाजीत कृणाल पांड्याने 4 षटकात 29 धावा देत 3 विकेट्स घेतल्या, शिवाय जोश हेझलवूडनेही 2 विकेट्स घेतल्या. तर केकेआरकडून अजिंक्य रहाणेने 56 धावांची सर्वाधिक खेळी खेळली. लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीकडून विराटने 59 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने संघाला एकतर्फी विजय मिळवून दिली. तत्तपूर्वी फिलीप साल्टने 56 धावांची वादळी खेळी करत सामना आरसीबीच्या पारड्यात आणला. मात्र तो 56 धावांवर बाद झाला, त्याला वरुण चक्रवर्तीने बाद केले.

     यानंतर देवदत्त पडिक्कलने 10 धावा करुन बाद झाला. त्यानंतर चाैथ्या क्रमाकावर आलेल्या रजत पाटीदार 34 धावांची वादळी खेळी खेळत संघाला विजायाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले, तो 34 धावांवर बाद शेवटी लियाम लिव्हिंगस्टोनने सलग चाैकर खेचत सामना 16.2 षटकात आरसीबीच्या नावे केला. अशाप्रकारे आरसीबीने आयपीएल 2025 च्या हंगामात विजयाने सुरूवात केली.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

पुण्यात डॉक्टरच करत होता ड्रग्सची तस्करी...तब्बल 15 लाखांचे मेफेड्रोन केले जप्त

Latest News

पुण्यात डॉक्टरच करत होता ड्रग्सची तस्करी...तब्बल 15 लाखांचे मेफेड्रोन केले जप्त पुण्यात डॉक्टरच करत होता ड्रग्सची तस्करी...तब्बल 15 लाखांचे मेफेड्रोन केले जप्त
      पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे त्यातच पुण्यातील बिबवेवाडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात
ग्रामविकास मंत्र्यांच्या तालुक्यातच बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ; कुळकजाई घाटात साईटपट्ट्या न भरल्यामुळे घाट बनला मृत्यूचा सापळा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयात पहिली अत्याधुनिक कृत्रिम सांधरोपण शस्त्रक्रिया यशस्वी
बँकांनी आर्थिक साक्षरता मेळावे आयोजित करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
प्रशासकीय यंत्रणांद्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती  अत्याचार प्रतिबंध अधिनियमाची  प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक - मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software