सिंहगड किल्ल्यावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; वादग्रस्त फलक लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल

पुणे:

पुण्याच्या ऐतिहासिक आणि गडप्रेमींचे श्रद्धास्थान असलेल्या सिंहगड किल्ला परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका अज्ञात समाजकंटकाने सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या हेतूने एक वादग्रस्त फलक लावला होता. या वादग्रस्त मजकुरामुळे गडप्रेमी आणि पर्यटकांमध्ये एकच खळबळ उडाली असून, परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, या फलकावर सिंहगड किल्ला हा केवळ हिंदूंचा असून येथे मुस्लिमांना प्रवेश बंदी असल्याचे लिहिण्यात आले होते. विशेष म्हणजे, हा फलक सर्वसामान्य नागरिकांना प्रशासकीय नियम किंवा शासकीय आदेश वाटावा, अशा पद्धतीने हुबेहूब तयार करण्यात आला होता. त्यावर 'आदेशावरून' असा स्पष्ट उल्लेख करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला होता.

हा वादग्रस्त फलक काही सजग नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने याची माहिती स्थानिक प्रशासनाला आणि पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीण पोलिसांनी तात्काळ पावले उचलत घटनास्थळी धाव घेतली आणि तो वादग्रस्त फलक तिथून हटवला. प्रशासनाने किंवा शासनाने असा कोणताही अधिकृत अथवा बंदीचा आदेश जारी केलेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी संबंधित अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा (NC) दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पुण्यात आर्थिक वादातून आणि त्रासाला कंटाळून सेंट्रींग ठेकेदाराची गळफास घेऊन आत्महत्या; अनेक दिग्गजांसह १३ जणांवर गुन्हा दाखल

Latest News

पुण्यात आर्थिक वादातून आणि त्रासाला कंटाळून सेंट्रींग ठेकेदाराची गळफास घेऊन आत्महत्या; अनेक दिग्गजांसह १३ जणांवर गुन्हा दाखल पुण्यात आर्थिक वादातून आणि त्रासाला कंटाळून सेंट्रींग ठेकेदाराची गळफास घेऊन आत्महत्या; अनेक दिग्गजांसह १३ जणांवर गुन्हा दाखल
पुणे (प्रतिनिधी): व्यावसायिक आर्थिक व्यवहारातील वाद, सतत मिळणाऱ्या धमक्या आणि त्रासाला कंटाळून एका ६५ वर्षीय सेंट्रींग ठेकेदाराने राहत्या घरी गळफास...
'हेरा फेरी ३' वादावर बाबू भैय्यांचा मोठा खुलासा! अक्षय कुमारने पाठवलेल्या '२५ कोटींच्या' नोटीसवर परेश रावल यांनी सोडले मौन!
फिफा वर्ल्ड कप २०२६ फायनल: मेस्सीची अर्जेंटिना बलाढ्य स्पेनला नमवून पुन्हा इतिहास रचणार का? जाणून घ्या विजयाचे '३' मुख्य फॉर्म्युले!
गुरुपौर्णिमेला शाळांना सुट्टी? गुजरात-बिहारच्या ऐतिहासिक निर्णयानंतर महाराष्ट्रातील पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष सरकारकडे!
'टाय' विसरल्याची धक्कादायक शिक्षा! इंडिगो कर्मचाऱ्याला थेट सुपरवायझरच्या 'पाया पडायला' लावलं; कंपनीच्या भूमिकेला कंटाळून दिला राजीनामा

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software