पुण्यात आर्थिक वादातून आणि त्रासाला कंटाळून सेंट्रींग ठेकेदाराची गळफास घेऊन आत्महत्या; अनेक दिग्गजांसह १३ जणांवर गुन्हा दाखल

पुणे (प्रतिनिधी):

व्यावसायिक आर्थिक व्यवहारातील वाद, सतत मिळणाऱ्या धमक्या आणि त्रासाला कंटाळून एका ६५ वर्षीय सेंट्रींग ठेकेदाराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात पुण्यातील काही बड्या व्यक्तींसह तब्बल १३ हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खलील रज्जूलाल शेख (वय ६५, रा. गुलटेकडी डायस प्लॉट, आशियाना रोशन बी बिल्डिंग, पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या संदर्भात मृत खलील यांच्या पत्नी सुल्ताना खलील शेख (वय ५०) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून विशाल केदारी, सुनील अय्यर आणि त्याचा मुलगा, रघू गौडा, सुनील बोरा, राजन शेठीया, हमीद भाई शेख आणि त्याचा मुलगा, बाळासाहेब शेडगे आणि त्याची पत्नी, रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी, शाम कोळपकर तसेच शुभम नावाच्या व्यक्तीविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ३१६(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत खलील शेख हे सेंट्रींग आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होते. सन २०१५ पासून ते १५ जुलै २०२६ या कालावधीत त्यांचे आरोपींसोबत व्यवसायानिमित्त आर्थिक व्यवहार झाले होते. या व्यवहारातून आरोपींनी खलील शेख यांना वारंवार धमक्या देऊन शिवीगाळ केली होती, ज्यामुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते. त्यातच आरोपी बाळासाहेब शेडगे याने खलील यांचे सेंट्रींगचे साहित्य जबरदस्तीने स्वतःकडे ठेवून घेतले होते.

या सततच्या जाचाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून खलील शेख यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी (सुसाईड नोट) लिहून ठेवली तसेच एक व्हिडिओ देखील बनवला. या दोन्हीमध्ये त्यांनी आरोपींच्या त्रासाचा उल्लेख केला आहे. त्यानंतर त्यांनी राहत्या घरात छताच्या पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. घटनास्थळावर आयबाईक व फॉरेन्सिक टीम पाचारण करण्यात आली असून, पोलिसांनी 'ई-साक्ष' देखील नोंदवून घेतली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र जगदाळे यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक प्रदिपसिंह सिसोदे पुढील तपास करत आहेत.

Ravindra-Dhangekar

Edited By: Nutan Bhise

खबरें और भी हैं

पुण्यात आर्थिक वादातून आणि त्रासाला कंटाळून सेंट्रींग ठेकेदाराची गळफास घेऊन आत्महत्या; अनेक दिग्गजांसह १३ जणांवर गुन्हा दाखल

Latest News

पुण्यात आर्थिक वादातून आणि त्रासाला कंटाळून सेंट्रींग ठेकेदाराची गळफास घेऊन आत्महत्या; अनेक दिग्गजांसह १३ जणांवर गुन्हा दाखल पुण्यात आर्थिक वादातून आणि त्रासाला कंटाळून सेंट्रींग ठेकेदाराची गळफास घेऊन आत्महत्या; अनेक दिग्गजांसह १३ जणांवर गुन्हा दाखल
पुणे (प्रतिनिधी): व्यावसायिक आर्थिक व्यवहारातील वाद, सतत मिळणाऱ्या धमक्या आणि त्रासाला कंटाळून एका ६५ वर्षीय सेंट्रींग ठेकेदाराने राहत्या घरी गळफास...
'हेरा फेरी ३' वादावर बाबू भैय्यांचा मोठा खुलासा! अक्षय कुमारने पाठवलेल्या '२५ कोटींच्या' नोटीसवर परेश रावल यांनी सोडले मौन!
फिफा वर्ल्ड कप २०२६ फायनल: मेस्सीची अर्जेंटिना बलाढ्य स्पेनला नमवून पुन्हा इतिहास रचणार का? जाणून घ्या विजयाचे '३' मुख्य फॉर्म्युले!
गुरुपौर्णिमेला शाळांना सुट्टी? गुजरात-बिहारच्या ऐतिहासिक निर्णयानंतर महाराष्ट्रातील पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष सरकारकडे!
'टाय' विसरल्याची धक्कादायक शिक्षा! इंडिगो कर्मचाऱ्याला थेट सुपरवायझरच्या 'पाया पडायला' लावलं; कंपनीच्या भूमिकेला कंटाळून दिला राजीनामा

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software