पुणे महापालिका नोकरी घोटाळ्याचा धक्कादायक प्रकार; पाच जणांची ६७ लाखांची फसवणूक

पुणे महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून ५ तरुणांची ६७ लाख रुपयांची फसवणूक. सिंहगड रोड पोलिसांत निवृत्त मुख्याध्यापकासह ५ जणांवर गुन्हा दाखल.

पुणे: पुणे महानगरपालिकेत विविध पदांवर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून पाच बेरोजगार तरुणांची तब्बल ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. महापालिकेच्या शाळेतील एका निवृत्त मुख्याध्यापकासह एकूण पाच जणांनी संगनमत करून हा बोगस नोकरीचा गोरखधंदा चालवला होता. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे महापालिका वर्तुळात आणि शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

       याप्रकरणी खडकवासला परिसरातील नांदोशी येथे राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संजय अनंता भालेराव (रा. कर्वेनगर - महापालिकेच्या शाळेतील निवृत्त मुख्याध्यापक), शिवानंद बाळासाहेब पाटील (रा. कर्वेनगर), अमित दारवटकर, आनंद लोंढणवार आणि अमित सुहास देशपांडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाचही संशयित आरोपींची नावे आहेत.

       पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, फिर्यादची दोन वर्षांपूर्वी संजय भालेराव यांच्याशी ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेत आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना पुणे महानगरपालिकेत सेवक, हवालदार आणि पर्यवेक्षक (सुपरवायझर) यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवले. सरकारी नोकरीच्या आशेपोटी फसवणूक झालेल्या तरुणांकडून आरोपींनी वेगवेगळ्या टप्प्यांतून तब्बल ६७ लाख रुपये लाटले. तरुणांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी महापालिकेचे बनावट शिक्के आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या असलेली वैद्यकीय तपासणीची (Medical Checkup) पत्रे दिली. या बोगस पत्रांच्या आधारे तरुणांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रेही सोपवण्यात आली.

       फसवणुकीची ही मालिका इथेच थांबली नाही, तर आरोपींनी महापालिकेचे बनावट शिक्के व अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या असलेले नियुक्ती आदेश (Appointment Letters) आणि अधिकृत ओळखपत्रे देखील पीडित तरुणांच्या हातात टेकवली. मात्र, प्रत्यक्षात नोकरीत रुजू होण्यासाठी किंवा खात्री करण्यासाठी जेव्हा तरुणांनी महापालिकेत जाऊन चौकशी केली, तेव्हा त्यांच्या हाती लागलेले सर्व कागदपत्रे आणि आदेश बनावट असल्याचे उघड झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणांनी आरोपींकडे भरलेले पैसे परत मागितले; परंतु आरोपींनी पैसे देण्यास स्पष्ट टाळाटाळ केली.

        दरम्यान, गेल्या काही दिवसांत महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अखेर निराश झालेल्या तरुणाने न घाबरता सिंहगड रोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद नोंदवली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सिंहगड रोड पोलिसांनी तात्काळ सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक भुपेश साळुंके या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत. बोगस नोकरीच्या रॅकेटमागे आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा नागपुरात भव्य नागरी सत्कार; 'मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी दिली नवी उंची' - देवेंद्र फडणवीस

Latest News

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा नागपुरात भव्य नागरी सत्कार; 'मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी दिली नवी उंची' - देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा नागपुरात भव्य नागरी सत्कार; 'मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी दिली नवी उंची' - देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांचा नागपुरात भव्य नागरी सत्कार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सन्मानचिन्ह व ₹५ लाखांचा धनादेश प्रदान....
पुणे महापालिका नोकरी घोटाळ्याचा धक्कादायक प्रकार; पाच जणांची ६७ लाखांची फसवणूक
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीतील स्पीकरवरील निर्बंध मागे घ्या; युवासेनेची पुणे पोलीस आयुक्तांकडे आक्रमक मागणी
कोथरूडमध्ये स्टेटसवरून वाद पेटला; १७ वर्षीय युवकाची हत्या, पुण्यात खळबळ
पालघरच्या कृषी विकासाला मोठी चालना; दापचरीत आंतरराष्ट्रीय कृषी बाजार

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software