कर्जमुक्ती योजनेत वयस्कर शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत बोटांचे ठसे न उमटणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष आधार प्रमाणीकरण सुविधा. सहकार विभागाचा निर्णय.

पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत वयस्कर शेतकरी तसेच बोटांचे ठसे उमटत नसलेल्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आधार प्रमाणीकरण करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सहकार विभागाने विशेष कार्यपद्धती निश्चित केली असून, अशा लाभार्थ्यांना पर्यायी पद्धतीने प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

      राज्य शासनाच्या या योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे सुरू आहे. महाआयटी मार्फत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यामध्ये १६.९६ लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. यापैकी १३.४८ लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, वयस्कर शेतकरी आणि बोटांचे ठसे स्पष्टपणे उमटत नसलेल्या लाभार्थ्यांना आधार प्रमाणी करणाच्या प्रक्रियेत अडचणी येत होत्या. त्यामुळे सहकार विभागाने ही विशेष सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सहकार आयुक्त तथा सहकारी संस्था निबंधक दीपक तावरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा उपनिबंधकांना या कार्यपद्धतीची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

         या सुविधेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने यादीतील आपला विशिष्ट क्रमांक घेऊन जवळच्याआपले सरकार’ सेवा केंद्रात जावे. त्यावेळी आधार कार्ड आणि बँक पासबुक सोबत ठेवणे आवश्यक आहे. सेवा केंद्रावर कर्जाशी संबंधित माहिती तपासल्या नंतर बोटांच्या ठशांद्वारे प्रमाणीकरणाचा प्रयत्न केला जाईल. एका बोटाचा ठसा उमटत नसल्यास वेगवेगळ्या बोटांनी किमान तीन वेळा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतरही आधार प्रमाणीकरण यशस्वी न झाल्यास सेवा केंद्र चालकाकडूनप्रमाणीकरण शक्य नाही’ हा पर्याय निवडला जाईल. त्यानंतर सेवा केंद्र चालकाच्या माध्यमातून पुढील प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. ही तक्रार ऑनलाइन पद्धतीने संबंधित तहसीलदारांकडे पाठवली जाईल.

      यानंतर लाभार्थी शेतकऱ्याला तहसील कार्यालयात जाऊन आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा उतारा आणि ओळख पटविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय समिती या कागदपत्रांची पडताळणी करून लाभार्थ्याची ओळख निश्चित करेल. आधार क्रमांक योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर समितीमार्फत तक्रार मंजूर करून प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

      प्रमाणीकरणाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमुक्तीच्या लाभाची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे बायोमेट्रिक अडचणींमुळे कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या वयस्कर आणि इतर पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. संबंधित लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्राशी संपर्क साधून या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा नागपुरात भव्य नागरी सत्कार; 'मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी दिली नवी उंची' - देवेंद्र फडणवीस

Latest News

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा नागपुरात भव्य नागरी सत्कार; 'मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी दिली नवी उंची' - देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा नागपुरात भव्य नागरी सत्कार; 'मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी दिली नवी उंची' - देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांचा नागपुरात भव्य नागरी सत्कार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सन्मानचिन्ह व ₹५ लाखांचा धनादेश प्रदान....
पुणे महापालिका नोकरी घोटाळ्याचा धक्कादायक प्रकार; पाच जणांची ६७ लाखांची फसवणूक
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीतील स्पीकरवरील निर्बंध मागे घ्या; युवासेनेची पुणे पोलीस आयुक्तांकडे आक्रमक मागणी
कोथरूडमध्ये स्टेटसवरून वाद पेटला; १७ वर्षीय युवकाची हत्या, पुण्यात खळबळ
पालघरच्या कृषी विकासाला मोठी चालना; दापचरीत आंतरराष्ट्रीय कृषी बाजार

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software