पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीतील स्पीकरवरील निर्बंध मागे घ्या; युवासेनेची पुणे पोलीस आयुक्तांकडे आक्रमक मागणी

पुण्यातील गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीतील स्पीकर व साउंड सिस्टीमवरील कथित निर्बंध मागे घेण्याची युवासेनेची पुणे पोलीस आयुक्तांकडे आक्रमक मागणी.

पुणे: पुढील महिन्यात रंगणाऱ्या लाडक्या बाप्पाच्या आगमना पूर्वी आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय नियमांमुळे वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत ध्वनीक्षेपक (स्पीकर) आणि साउंड सिस्टीमच्या वापरावर पोलीस प्रशासनाने घातलेले कथित निर्बंध तातडीने मागे घेण्यात यावेत, अशी ठाम मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे. युवासेनेचे पुणे महानगर अध्यक्ष हेमंत आबा बागुल यांनी यासंदर्भात थेट पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले असून, या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.

          पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सावाला शेकडो वर्षांची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि समृद्ध धार्मिक परंपरा लाभली आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणारी विसर्जन मिरवणूक तब्बल २४ ते ३० तास अविरत चालते, ज्यामध्ये देशभरातून आणि परदेशातून लाखों भाविक व नागरिक सहभागी होतात. या काळात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी, गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुणे पोलीस अहोरात्र परिश्रम घेत असतात. पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळे यांच्यातील परस्पर समन्वया मुळेच हा महासोहळा दरवर्षी शिस्तीत पार पडतो, याची आठवण युवासेनेने निवेदनात करून दिली आहे. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर विसर्जन मिरवणुकीत स्पीकर वापराबाबत पोलीस प्रशासनाने काही जाचक निर्बंध घातल्याचा दावा करण्यात आला आहे.

         असा कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी शहरातील सर्व लहान-मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांना विश्वासात घेणे आणि त्यांची बाजू ऐकून घेणे आवश्यक होते, असे हेमंत आबा बागुल यांनी म्हटले आहे. बहुतांश गणेश मंडळे ही सर्वसामान्य नागरिकांच्या लोकवर्गणीतून आणि वर्गणीदारांच्या सहकार्यातून उत्सव साजरी करतात. या मंडळांनी विसर्जन मिरवणुकी साठी साउंड सिस्टीम, वाद्ये आणि स्पीकरचे बुकिंग महिन्याभरा पूर्वीच करून ठेवले आहे. ऐनवेळी अशा प्रकारचे अचानक निर्बंध लागू झाल्यास गणेश मंडळांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागण्या सोबतच नियोजनात्मक मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे गणेश मंडळांच्या भावनांचा आदर करत पोलिसांनी या निर्णयाचा फेरविचार करावा आणि मिरवणुकीतील स्पीकरवरील निर्बंध पूर्णपणे मागे घ्यावेत, अशी आक्रमक मागणी युवासेने कडून करण्यात आली आहे.

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा नागपुरात भव्य नागरी सत्कार; 'मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी दिली नवी उंची' - देवेंद्र फडणवीस

Latest News

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा नागपुरात भव्य नागरी सत्कार; 'मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी दिली नवी उंची' - देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा नागपुरात भव्य नागरी सत्कार; 'मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी दिली नवी उंची' - देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांचा नागपुरात भव्य नागरी सत्कार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सन्मानचिन्ह व ₹५ लाखांचा धनादेश प्रदान....
पुणे महापालिका नोकरी घोटाळ्याचा धक्कादायक प्रकार; पाच जणांची ६७ लाखांची फसवणूक
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीतील स्पीकरवरील निर्बंध मागे घ्या; युवासेनेची पुणे पोलीस आयुक्तांकडे आक्रमक मागणी
कोथरूडमध्ये स्टेटसवरून वाद पेटला; १७ वर्षीय युवकाची हत्या, पुण्यात खळबळ
पालघरच्या कृषी विकासाला मोठी चालना; दापचरीत आंतरराष्ट्रीय कृषी बाजार

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software