फडणवीसांच्या वाढदिवसाला सामाजिक उपक्रमांची जोड; भाजपकडून 'राजस्व अभियाना'ची घोषणा

मुंबई:

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस 'सेवा यज्ञ' आणि 'सेवा दिवस' म्हणून साजरा करण्याचा संकल्प भाजपने केला आहे. या अंतर्गत राज्यभरात सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबवले जाणार असून, १ लाख रक्तदात्यांच्या सहभागासह मोठे महारक्तदान अभियान आयोजित केले जाणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे. हे रक्तदान अभियान १९ ते २३ जुलै या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात राबवले जाणार आहे.

शासकीय यंत्रणा आणि पक्ष संघटनेच्या संयुक्त विद्यमाने २२ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत विशेष 'राजस्व अभियान' चालवले जाणार आहे. या अभियानांतर्गत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, युवक आणि दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या जागीच सोडवण्यावर भर दिला जाईल. विशेषतः शेतकऱ्यांसाठी 'मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना' अधिक प्रभावीपणे राबवून राज्यातील शेत पाणंद रस्त्यांचा कायापालट केला जाणार आहे. याशिवाय ७/१२ उताऱ्यावर नाव नोंदवणे, नोंदी दुरुस्त करणे, वारस नोंद करणे आणि ७/१२ चे फेरफार किंवा तुकडे पाडणे यांसारखी महसूल विभागाशी संबंधित कामे या मोहिमेद्वारे जलद गतीने पूर्ण केली जाणार आहेत.

रक्तदान हेच श्रेष्ठदान असून एका व्यक्तीचे रक्तदान दुसऱ्या कोणासाठी तरी जीवनदान ठरू शकते, त्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महारक्तदान शिबिरात आणि महसूल अभियानाच्या शिबिरांमध्ये सहभागी होऊन विविध सरकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे. या सामाजिक उपक्रमांमुळे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला एक वेगळे औचित्य प्राप्त झाले असून राज्यभरातील नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

राजधानीत आंदोलनाचा उद्रेक; पोलिस कारवाईनंतर राहुल गांधी व प्रियंका गांधी ताब्यात

Latest News

राजधानीत आंदोलनाचा उद्रेक; पोलिस कारवाईनंतर राहुल गांधी व प्रियंका गांधी ताब्यात राजधानीत आंदोलनाचा उद्रेक; पोलिस कारवाईनंतर राहुल गांधी व प्रियंका गांधी ताब्यात
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ पंतप्रधान निवासाबाहेर आंदोलन करणाऱ्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जंतर-मंतरवर शरद पवारांनी घेतली...
पुण्यात आर्मी लॉ कॉलेजमध्ये 'प्राचार्य' पदाची भरती; ३० जुलैला थेट मुलाखत
बँकिंग क्षेत्रात मोठ्या पदांवर नोकरीची संधी! युनियन बँक ऑफ इंडियाकडून ३९५ जागा जाहीर
२३ वर्षांनंतर घेतला बापाच्या हत्येचा बदला! पुण्यातील कात्रज बोगद्याजवळील मर्डर मिस्ट्रीचा पर्दाफाश
दिल्लीत कायदा व सुव्यवस्था धोक्यात! आंदोलकांच्या दगडफेकीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह ११८ जखमी

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software