भवानी माता यात्रेनिमित्त मार्डीतील रक्तदान शिबिरास प्रतिसाद  

दहिवडी: भवानी माता यात्रे निमित्त मार्डी यात्रा कमिटी व युवाशक्ती ग्रामविकास समिती मार्डी यांचे वतीने आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते .या शिबिराला ग्रामस्थांचा, युवा वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला. इतर कार्यक्रमाला फाटा देत, असे सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्यामुळे एक चांगला विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असेच कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल ग्रामस्थांनी कौतुक केले.आता दरवर्षी यात्रेनिमित्त ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली युवा वर्गाच्या साथीने रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, इत्यादी कार्यक्रम युवाशक्ती ग्रामविकास समिती मार्डी यांचे वतीने करण्यात येणार आहेत. मा.यशवंतराव चव्हाण ब्लड बँक कराड यांचे सहकार्य लाभले. तसेच गावातील व पंचक्रोशीतील सर्व रक्तदाते यांचे हार्दिक आभार. माधव राऊत सामाजिक कार्यकर्ते, चंद्रकांत पोळ, योगेश मारुती पोळ, सयाजी जाधव यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन केले.
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

IPPB भरती २०२५: इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत या पदांसाठी भरती

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software