विंग येथे सहकार परिषद संपन्न

सातारा: खंडाळा तालुक्यातील सर्व सेवक सहकारी पतसंस्था व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, खंडाळा यांचे वतीने आंतरराष्ट्रीय सहकार  वर्ष 2025 निमित्त सहकार परिषद व मेळाव्याचे आयोजन  रामेश्वर गार्डन विंग ता. खंडाळा येथे खासदार नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  करण्यात आले होते.  सहकार परिषदेस अप्पर निबंधक सहकारी संस्था श्रीकृष्ण वाडेकर, जिल्हा उपनिबंधक संजकुमार सुद्रिक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील सहायक उपनिबंधक प्रिती काळे यांच्यासह विविध तालुक्यांचे सहायक निबंधक व विविध सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
     सहकारी संस्था  गरजूना वेळेत  कुठल्याही प्रकारचा त्रास न होता नागरिकांना सहजरित्या  कर्ज उपलब्ध करुन देत आहेत. सामान्य माणसाची समाजात पत निर्माण करणा-या संस्था म्हणजे पतसंस्था, असे प्रतिपादन खासदार  पाटील यांनी कार्यक्रमा प्रसंगी केले. तसेच अप्पर निबंधक सहकारी संस्था वाडेकर, जिल्हा उपनिबंधक सुद्रिक यांनी नियामक मंडळ व पतसंस्था संबंधीत विषयांवर मार्गदर्शन केले.
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

केव्ही सीआर सोलापूर येथे या पदांसाठी भरती... जाणून घ्या सविस्तर

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software