शासनमान्य ग्रंथांच्या यादीकरिता प्रकाशित ग्रंथ पाठविण्याचे आवाहन

सातारा: राज्यातील शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना राज्यात मराठी भाषेत प्रकाशित झालेल्या ग्रंथांची माहिती वा खरेदी करिता मार्गदर्शक ठरावी म्हणून ग्रंथालय संचालनालयाकडून ग्रंथ निवड समितीच्या सदस्यांनी शिफारस केलेली वर्षनिहाय "शासनमान्य ग्रंथांची यादी" प्रकाशित करण्यात येते. सदर शासनमान्य ग्रंथांची यादीकरिता सन २०२४ या कॅलेंडर (१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४) वर्षात प्रकाशित झालेल्या मराठी भाषेतील ग्रंथांची निवड करण्यासाठी आणि शासनमान्य ग्रंथांच्या यादीत समावेश होण्याच्या दृष्टीने सन २०२४ या कॅलेंडर वर्षामध्ये प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांची प्रत्येकी एक प्रत  ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, टाऊन हॉल, मुंबई-४०० ००१ यांच्याकडे दिनांक १५ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत पाठविण्यात यावीत, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीनिवास मंगलपल्ली यांनी केले आहे.
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

केव्ही सीआर सोलापूर येथे या पदांसाठी भरती... जाणून घ्या सविस्तर

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software