मलवडी सोसायटीच्या चेअरमनपदी संतोष मगर, व्हा. चेअरमनपदी सचिन देवकर; बिनविरोध निवडी

दहिवडी:   मलवडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी संतोष प्रल्हाद मगर तर उपाध्यक्षपदी सचिन हणमंत देवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मिलिंद खरात यांनी अध्यक्ष पदाचा तर कल्पना दळवी यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी संतोष आवळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी सचिव नवीन जाधव, मिलिंद खरात, कल्पना दळवी, संजय जाधव, पोपट कदम, सचिन मगर, ताराचंद जगदाळे, कुंडलिक नवले, पदमा मगर, मानसिंग जगदाळे, अनिल सुतार आदी संचालक उपस्थित होते. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अनुक्रमे संतोष मगर व सचिन देवकर यांचेच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी गणेश जगदाळे, जयदीपकुमार मगर, बाळासाहेब चव्हाण, वैभव खरात, संतोष मगर, आप्पा दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
        राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासो पवार, सत्रेवाडीचे माजी सरपंच दादासो नवले, मलवडीच्या सरपंच दिपाली जगदाळे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
  "१९४८ साली स्थापन झालेली ही सोसायटी सलग तीन वर्षे नफ्यात आहे. यावर्षीचा नफा १३ लाखांपेक्षा जास्त आहे. मागील अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी दिलेले योगदान व वेळेवर कर्जाची परतफेड करणारे कर्जदार यामुळे हे शक्य झाले आहे. यापुढेही सर्वांना सोबत घेऊन सोसायटीला प्रगतीपथावर नेण्यासाठी कार्यरत राहू." संतोष मगर, नवनिर्वाचित अध्यक्ष, मलवडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

केव्ही सीआर सोलापूर येथे या पदांसाठी भरती... जाणून घ्या सविस्तर

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software