धनंजय जगताप यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 'अकरा लाख' रुपये मदत

दहिवडी:  पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 'धनंजय जगताप असोसिएटस' कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अकरा लाख' रुपये मदत देण्यात आली आहे. महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला असून सातारा जिल्ह्यातील काही ठिकाणांसह सोलापूर, धाराशिव, बीड आदी जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्तांची अवस्था भयावह झाली आहे. महाराष्ट्र शासनासह स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती मदतीसाठी सरसावले आहेत. माण तालुक्यातील आंधळी गावाचे शेतकरी पुत्र धनंजय जगताप हे मदतीसाठी पुढे आले आहेत. स्वकष्टाने बांधकाम व्यावसाय व जमीन खरेदी विक्रीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जगताप यांनी धनंजय जगताप असोसिटसकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अकरा लाख रुपये मदत दिली आहे.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

केव्ही सीआर सोलापूर येथे या पदांसाठी भरती... जाणून घ्या सविस्तर

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software