किसनवीर कारखान्याच्या सेवानिवृतांची येणे असलेल्या बाकीची मागणी

भुईंज : किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्यामधून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांनी कारखान्याकडून त्यांची येणे असलेली रक्कम मागणीकरिता विद्यमान चेअरमन ना.मकरंद पाटील यांचे निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी कारखान्याचे संचालक खा.नितीनकाका पाटील यांच्यापुढे गाऱ्हाणे गाऊन त्यांचे हाती मागण्यांचे निवेदन दिले असून यापूर्वी  कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांना दिलेल्या मागणी अर्जावर कुठलाच निर्णय न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

         निवेदन अर्जा‌द्वारे विनंती करुन त्यात म्हटले आहे की, आम्ही किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे सुमारे 94 कामगार सन 2019 ते 2024 दरम्यान सेवानिवृत्त झालो अथवा नोकरीतून मुक्त झालो आहोत. त्यामु‌ळे आमच्या हाती कोणतेही काम नसल्यामु‌ळे आम्ही अर्थिक विवंचनेत आहोत. त्याचा परिणाम आमच्यावर विसंबून असणा-या आमच्या परिवारावर होत आहे. आमचा कारखान्याकडे येणे असलेला निवृत्त कामगारांचा थकीत पगार, सर्व कामगारांच्या पगारातून कपात झालेल्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम व त्यापैकी भरणा केलेल्या रक्कमेतील फरक, पगारातून कपात झालेल्या विमा, बँक 101, सोसायटी बेअर्स, कर्ज हप्ते इ रक्कमा ज्या- त्या संस्थेकडे तातडीने वर्ग कराव्यात, शिल्लक रजेचा पगार त्वरीत मिळावा. येणे असलेली ग्रॅच्यूटी रक्कम तातडीने वर्ग व्हावी. कामगार सोसायटी कडील येणे देणे हिशोब करून उर्वरीत शेअर्स व ठेवी रक्कम तातडीने दिली जावी. थकीत वेतन काळातील बोनस रक्कम दिली जावी, थकीत पेन्शन देण्यात यावी व हंगामी कामगारांचा रिटेंशन मिळावा या सर्व मागण्यांचा विचारविनिमय होऊन त्वरीत निर्णय घेण्यात यावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय काही मयत कामगारांची देणीसुद्धा प्रशासनाने न दिल्याबद्दल खेद व्यक्त करण्यात आला. विनंतीपत्रावर सुमारे 94 कामगारांच्या सह्या आहेत.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

Latest News

मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
पुणे: गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच आगामी मान्सूनमधील पावसाचा अंदाज पाहता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसोबत सर्वच...
किसन वीर'चे गळित हंगाम २०२४-२५ चे ऊस बील आदा
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री क्षेत्र चांदवड येथे रेणुका देवीचे घेतले दर्शन
महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे राज्य - उद्योग मंत्री उदय सामंत
सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software