- Hindi News
- सातारा
- जिल्ह्यात मुसळधार पाऊस ; बॉम्बे रेस्टोरंट चौकात वाहतूक कोंडी
जिल्ह्यात मुसळधार पाऊस ; बॉम्बे रेस्टोरंट चौकात वाहतूक कोंडी
By Lokprant
On

सातारा: काल झालेल्या मुसळधार पावसाने बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित नसल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला. अनेक तास चौकामध्ये प्रचंड वाहतुकी कोंडी झाली. सदरचा भाग त्रिशंकू असल्यामुळे या भागाकडे जिल्हा परिषद ग्रामपंचायत तसेच नगरपरिषद या भागाकडे सामाजिक समस्या वर कोणाकडेच नाही मागता येत नाही.काल झालेल्या पावसामुळे वनवासवाडी भागामध्ये खेड ग्रामपंचायतीने रस्त्याचे डांबरीकरण करताना गटर कामाला कुठेच वाव दिला नसल्याने रस्त्यावर तसेच रस्त्यालगत असणाऱ्या ज्योतिबा मंदिरामध्ये पाच फूट पाणी असल्याने नागरिक संतप्त झाले होते. तसेच अनेक अपॉइंटमेंटच्या बेसमेंट मध्ये गुडघाभर पाणी साचले होते. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडल्यामुळे विद्युत पुरवठा बराच वेळ खंडित करण्यात आला होता.
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं
किसन वीर'चे गळित हंगाम २०२४-२५ चे ऊस बील आदा
By Lokprant
खंबाटकी घाटात ट्रक बंद पडल्याने ट्राफिक जाम
By Lokprant

Latest News
23 May 2025 18:12:13
पुणे: गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच आगामी मान्सूनमधील पावसाचा अंदाज पाहता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसोबत सर्वच...