खटाव व दहिवडी येथील मुलांच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु

सातारा:  खटाव व दहिवडी  येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागास वर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया  सुरु झाली आहे. शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत खटाव व दहिवडी  येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चालविले जाते.  इच्छुक विद्यार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेश घ्यावा असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे. वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. वसतिगृह कार्यालयातून विहीत नमुन्यातील वसतिगृह प्रवेशाचे अर्ज प्राप्त करून घेवून ते हायस्कूल विभागागात 30 जून पर्यंत आवश्यक त्या कागदपत्रासह (मागिल वर्षाचे गुणपत्रक, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, दिव्यांग असल्यास दिव्यांग दाखला व अनाथ असल्यास अनाथाचा दाखला इ.) वसतिगृह कार्यालयात सादर करावेत.

       वसतिगृहात इयत्ता ८ वी. पासून पुढील शिक्षण घेणाऱ्या व ज्यांचे वार्षिक उत्पन्न रू. २.५० लाख पेक्षा कमी आहे अशा अनु. जाती संवर्गातील विद्यार्थाना गुणवत्तेनुसार व आरक्षणानुसार प्रवेश दिला जातो. वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत निवास, भोजन, नाष्टा, दुध, फळे, अंडी, अंथरूण-पांघरूण, शैक्षणिक स्टेशनरी, वह्या व पुस्तके मोफत पुरविली जातात. तसेच प्रवेशितांना दरमहा रू. ५००/- निर्वाहभत्ता दिला जातो. विद्यालय विभागाच्या सर्व व ज्या कॉलेजमध्ये गणवेश सक्तीचा आहे त्या विद्यार्थ्यांना गणवेशासाठी रोख रक्कम दिली जाते. शैक्षणिक सहल खर्च व जर्नल खरेदीची रक्कम देखील दिली जाते.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

Latest News

मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
पुणे: गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच आगामी मान्सूनमधील पावसाचा अंदाज पाहता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसोबत सर्वच...
किसन वीर'चे गळित हंगाम २०२४-२५ चे ऊस बील आदा
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री क्षेत्र चांदवड येथे रेणुका देवीचे घेतले दर्शन
महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे राज्य - उद्योग मंत्री उदय सामंत
सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software