सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी

   सातारा  जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने चेन्नई वरून  धमकीचा मेल केला आहे. त्यामध्ये आज दुपारी 3:15 वाजता सातारा कलेक्टर ऑफिस बॉम्ब ने उडवण्याची धमकी दिली आहे. मेल आल्या नंतर कलेक्टर ऑफीस मध्ये खळबळ उडाली. त्यानंतर लगेचच कलेक्टर ऑफिस परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.कार्यालयातील सर्व दुचाकी,चारचाकी गाड्या बाहेर काढण्यात आल्या आहेत.

       काल  पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा मेल आला होता. त्यानंतर पोलिसांनी कार्यालय रिकामे करण्यास सुरुवात केली. आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालया सोबत   सकाळी ११.३० वाजता साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेज उडवून देण्याच्या धमकीचा फोन झाला होता.ऐन पावसात बॉम्ब शोधक पथकांची धांदल उडाली आहे.भर पावसात बॉम्ब स्कॉड पथक दाखल झाले असून शोधकार्य सुरू आहे.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

Latest News

मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
पुणे: गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच आगामी मान्सूनमधील पावसाचा अंदाज पाहता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसोबत सर्वच...
किसन वीर'चे गळित हंगाम २०२४-२५ चे ऊस बील आदा
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री क्षेत्र चांदवड येथे रेणुका देवीचे घेतले दर्शन
महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे राज्य - उद्योग मंत्री उदय सामंत
सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software