किसन वीर'चे गळित हंगाम २०२४-२५ चे ऊस बील आदा

किसन वीर व खंडाळ्याच्या बीलापोटी जमा केले रू.१५८ कोटी ९६ लाख

भुईंज: किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याकडे सन २०२४-२५ मध्ये गळितासाठी आलेल्या संपुर्ण ऊस बीलाची रूपये ३ हजार प्रति मेट्रिक टनाप्रमाणे होणारी संपुर्ण रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली असुन किसन वीर-खंडाळा कारखान्याकडे गळितासाठी आलेल्या ऊस बीलाची संपुर्ण रकम यापूर्वीच जमा केली असल्याची माहिती, किसन वीर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

       प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, सन २० २४-२५ मध्ये ऊसाची उपलब्धता कमी असतानादेखील किसन वीर कारखान्याने ३ लाख ९२ हजार ९०४ तर खंडाळा कारखान्याने १ लाख ३६ हजार ९९० मेट्रिक टन गाळप केलेले होते. किसन वीर कारखान्याचे ३ हजार रूपयांप्रमाणे ११७ कोटी ८७ लाख ११ हजार १० रूपये तर खंडाळा कारखान्याचे ४१ कोटी ९ लाख ७१ हजार २७२ रूपये संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर
संपुर्णपणे वर्ग केलेले आहेत. खंडाळा कारखान्याचे फेब्रुवारीअखेरचे बील २८ एप्रिल रोजी संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केलेले होते. किसन वीर व किसन वीर-खंडाळा दोन्ही कारखान्याची मिळुन रूपये ३ हजार प्रति मेट्रिक टनाप्रमाणे होणारी रक्कम १५८ कोटी ९६ लाख ८२ हजार २८२ रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेली आहे.

    किसन वीर कारखान्याचे उर्वरित संपुर्ण बील आज (शुक्रवारी) संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच शेतीच्या मशागतीसाठीही या पैशांचा उपयोग होणार असल्याने शेतकऱ्यांसाठी द्विगुणीत आनंदाचा क्षण असल्याचे मानले जाते. नामदार मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मागील तीन हंगामातील सर्व देय्यके दिल्यामुळे तसेच सन २०२०-२१ मधील थकीत ऊस बील दिल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. नामदार मकरंदआबा पाटील व खासदार नितीनकाका पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळावर असलेल्या विश्वासाची व प्रेमाची पोहोच पावती म्हणूनच येणाऱ्या गळित हंगाम सन २०२५-२६ करिता दोन्ही कारखान्याकडे ऊस नोंदीचे प्रमाण मागील तीन वषपिक्षा जास्त झाली असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. उर्वरित शेतकऱ्यांनीही आपल्या ऊसाची नोंद वेळेत करावी. येणाऱ्या गळित हंगाम २०२५-२६ मध्ये आपला संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यालाच गळितासाठी पाठविण्याचे आवाहन नामदार मकरंदआबा पाटील, खासदार नितीनकाका पाटील, व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाईस चेअरमन राजेद्र तांबे, कार्यकारी संचालक जितंद्र रणवरे व दोन्ही कारखान्याच्या संचालक मंडळाने केलेले आहे.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

Latest News

मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
पुणे: गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच आगामी मान्सूनमधील पावसाचा अंदाज पाहता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसोबत सर्वच...
किसन वीर'चे गळित हंगाम २०२४-२५ चे ऊस बील आदा
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री क्षेत्र चांदवड येथे रेणुका देवीचे घेतले दर्शन
महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे राज्य - उद्योग मंत्री उदय सामंत
सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software