मुंबईत कोरोना रुग्णाचा मृत्यू ; ठाण्यातील पहिला बळी

      राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची लाट पसरण्याची शक्यता दिसून येत आहे. अशातच ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्यातील एका तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  हा तरुण  मुंब्रा येथील रहिवासी असून त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी सहा वाजता पहाटे त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या 21 वर्षीय तरुणाला 22 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान 23 मे रोजी त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली व त्याचे उपचाराला प्रतिसाद देणे बंद झाल्याने आज  पहाटे सहा वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला.

  रुग्ण संख्येत वाढ राज्याला सतर्कतेचा ईशारा
          देशासह राज्यात देखील कोरोनाच्या रुग्णसंखेत वाढ होत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, स्वच्छता बाळगणे तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे व योग्य खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच काही लक्षणे आढळल्यास तात्काळ चाचणी करून घेण्याचे देखील आवाहन केले आहे. मुंबईतील रुग्णांमध्ये वाढ होत असून 23 मे रोजी नवीन 45 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 35 कोरोना रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या 185 वर पोहोचली असून महानगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेचा व सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

पुण्यात चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी 

Latest News

पुण्यात चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी  पुण्यात चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी 
              वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने पुणे शहर हादरले असताना, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या बेजबाबदार वक्तव्याने संतापाची लाट उसळली
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नारायणगाव पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे लोकार्पण
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांत्वन
तीन वेळा मुलीवर केले अत्याचार ; मठात जुगार, मटक्याची माहिती देणाऱ्या लोकेश्वर स्वामीला ठोकल्या बेड्या
घराच्या बाहेर होते तब्बल 30 साप....लोकांची पळता भुई थोडी

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software