- Hindi News
- राष्ट्र
- ज्येष्ठ कवी गीतकार गुलझार यांचा ज्ञानपीठने गौरव
ज्येष्ठ कवी गीतकार गुलझार यांचा ज्ञानपीठने गौरव

प्रसिद्ध कवी, गीतकार गुलजार यांना भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान असलेल्या 58 व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शब्दांवर कमालीच प्रभुत्व मिळवणारे ज्येष्ठ लेखक, गीतकार हे प्रकृती अस्वस्थ्यामुळे काही दिवसांपूर्वी दिल्लीत पार पडलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते उपस्थित राहू शकले नव्हते त्यामुळे त्यांना त्यांच्या राहत्या घरी या पुरस्काराने गौरवण्यात आलं. यावेळी भारतीय ज्ञानपीठाचे विश्वस्त मुदित जैन, माजी सचिव धर्मपाल आणि महाव्यवस्थापक आर एन तिवारी यांनी हा पुरस्कार प्रदान केला. यावेळी चित्रपट निर्माते, संगीतकार विशाल भारद्वाज, गुलझार यांची पत्नी रेखा, जावई गोविंद सिंधू व इतर साहित्यिक उपस्थित होते.
या आधी गुलझार यांना 2008 मध्ये स्लमडॉग मिलेनियर चित्रपटातील जय हो गाण्यासाठी ग्रामी व अकादमी पुरस्कार आणि भारतीय चित्रपट उद्योगातील योगदानासाठी 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 2002 मध्ये साहित्य अकादमी, 2004 मध्ये पद्मभूषण आणि आता 2025 मध्ये ज्ञानपीठ या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले. अकरा लाख रुपये रोख, प्रशस्तीपत्रक व वाग्देवी सरस्वतीची कांस्यमूर्ती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

खबरें और भी हैं
ज्येष्ठ कवी गीतकार गुलझार यांचा ज्ञानपीठने गौरव
किसन वीर'चे गळित हंगाम २०२४-२५ चे ऊस बील आदा
