अभिनेता मुकुल देव यांचे निधन; दिल्लीत होणार अंतिम संस्कार

    भारतीय चित्रपट सृष्टीतील बहुमुखी अभिनेता मुकुल देव यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. टीव्ही आणि चित्रपट अभिनेते मुकुल देव यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन झाले. हा अभिनेता बऱ्याच काळापासून आजारी होता.मुकुल देव यांचे अंतिम संस्कार आज दिल्लीत होतील. त्यांचा भाऊ राहुल देव यांनी सोशल मीडियावर ही दुःखद बातमी शेअर केली. त्यांच्या अनपेक्षित निधनाने त्यांच्या सहकाऱ्यांवर आणि चाहत्यांवर खोल परिणाम झाला आहे.मुकुल चा जन्म दिल्लीत  पंजाबी कुटुंबात झाला होता.

       शिस्तबद्ध कुटुंबात जन्माला आलेल्या मुकुलने सुरुवातीला पायलटचे शिक्षण घेतले परंतु खरी आवड अभिनयात असल्याने 1996 मध्ये त्यांनी मुमकिन या मालिकेतून टेलिव्हीजन वर पदार्पण केले. त्यानंतर दस्तक या फिल्म मधून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले व लोकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. त्यानंतर त्यांनी यमला पगला दिवाना, सन ऑफ सरदार अशा चित्रपटातून स्वतःची ओळख निर्माण केली. आपल्या डायलॉग च्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी शिल्पा व मुलगी सिया आहे.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

पुण्यात चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी 

Latest News

पुण्यात चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी  पुण्यात चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी 
              वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने पुणे शहर हादरले असताना, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या बेजबाबदार वक्तव्याने संतापाची लाट उसळली
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नारायणगाव पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे लोकार्पण
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांत्वन
तीन वेळा मुलीवर केले अत्याचार ; मठात जुगार, मटक्याची माहिती देणाऱ्या लोकेश्वर स्वामीला ठोकल्या बेड्या
घराच्या बाहेर होते तब्बल 30 साप....लोकांची पळता भुई थोडी

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software