- Hindi News
- राष्ट्र
- घराच्या बाहेर होते तब्बल 30 साप....लोकांची पळता भुई थोडी
घराच्या बाहेर होते तब्बल 30 साप....लोकांची पळता भुई थोडी
By Lokprant
On

उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील शाहबाद एसडीएम कॉलनीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुपारच्या सुमारास एका घराच्या पायरीखालून अचानक तब्बल सापांची 30 पिल्ले आणि त्यांच्यासोबत एक मोठा साप बाहेर काढण्यात आला.घराजवळ काहीतरी विचित्र हालचाल होत असल्याचे पाहून परिसरातील लोकांनी तात्काळ ॲनिमल केअर फाउंडेशनला याची माहिती दिली.सर्पमित्र सिंटू घटनास्थळी पोहोचले व त्यांनी कोणताही विलंब न लावता सर्व सापांना सुरक्षितपणे पकडले व जंगलात सोडून दिले. सर्प मित्राने दिलेल्या माहिती नुसार, हे पाण्यात राहणारे 'चेकर्ड कीलबॅक' जातीचे साप होते. हे साप विषारी नसतात, पण त्यांच्या चाव्यामुळे खूप वेदना आणि सूज येऊ शकते. साप पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली होती.
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं
ज्येष्ठ कवी गीतकार गुलझार यांचा ज्ञानपीठने गौरव
By Lokprant
किसन वीर'चे गळित हंगाम २०२४-२५ चे ऊस बील आदा
By Lokprant

Latest News
25 May 2025 12:12:05
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने पुणे शहर हादरले असताना, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या बेजबाबदार वक्तव्याने संतापाची लाट उसळली