- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- सोलापूर मध्ये घरगुती हिंसाचारामधून विवाहितेला बेदम मारहाण
सोलापूर मध्ये घरगुती हिंसाचारामधून विवाहितेला बेदम मारहाण
सोलापूर मध्ये घरगुती हिंसाचारामधून विवाहितेला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापूर मधील टेंभुर्णी येथील महिलेला दीर व जाऊ यांच्याकडून ही मारहाण झाली आहे. मारहाणीच्या घटनेनंतर चित्रा भोसले यांच्या शरीरावर मारल्याचे व्रण दिसत असल्याची माहिती मिळाली तसेच मारहाणी मध्ये चित्रा यांच्या कानाचा पडदा फाटल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. यापूर्वी त्यांचा हुंड्याच्या पैशांसाठी छळ करण्यात आला होता आणि दोन वर्षानंतर भोसले कुटुंबीयांनी चित्रा भोसले यांना नांदवण्यासाठी लेखी हमी दिल्यानंतर त्या नांदण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान चित्रा भोसले यांना जीवे मारण्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यासंबंधी टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.
वैष्णवी हगवणे हुंडा प्रकरण सुरू असताना सोलापुरातून ही घटना समोर येत आहे. सोलापूर येथील टेंभुर्णी येथे ही हुंडा मागणी पूर्ण न झाल्याने महिलेला मारहाण करण्यात आली आहे. चित्रा भोसले असे पीडित महिलेचे नाव आहे. गेल्या 19 वर्षापासून चित्रा भोसले यांना त्यांच्या सासरचे हुंड्यासाठी त्रास देत होते. मात्र २०१४ मध्ये हुंडा प्रकरणातील कलम 498 अंतर्गत त्यांना त्रास देणाऱ्या भोसले कुटुंबीयांवर टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 11 ते 12 मे रोजी सदर महिलेला चारित्र्यावरून संशय घेऊन दीर व जाऊ यांनी बेदम मारहाण केली. 14 मे पासून टेंभुर्णी पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. 14 मे ते 24 मे या कालावधीमध्ये अजूनही गुन्हा दाखल झालेल्या चौघांना पोलिसांनी अटक केली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन पथके रवाना करण्यात आली असून वाढीव कलमे ३०७ म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. दरम्यान चित्रा भोसले यांना झालेल्या मारहाणी मध्ये त्यांच्या कानाला दुखापत झाली असून टेंभुर्णी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
