पुण्यात चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी 

       वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने पुणे शहर हादरले असताना, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या बेजबाबदार वक्तव्याने संतापाची लाट उसळली आहे. चाकणकर यांनी पीडित जनतेला 'चिल्लर' संबोधल्याचा आरोप करत आज सकाळी 12 वाजता पुण्यातील गुडलक चौकातील कलाकार कट्टा येथे 'थील्लर पे चिल्लर फेको' आंदोलन करण्यात आले. बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गॅंग यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात चाकणकर यांच्या फोटोवर चिल्लर टाकून आंदोलन केले.

वैष्णवी हगवणे प्रकरणाने खळबळ 
         गेल्या आठ दिवसांपासून वैष्णवी हगवणे हिच्या हुंडाबळी हत्या की आत्महत्या यावरून शहरात चर्चा सुरू आहे. या प्रकरणाने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सहा महिन्यांपूर्वी मयुरी हगवणेने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, आयोगाने तक्रारीची दखल न घेतल्याने आणि कारवाई न केल्याने वैष्णवीचा बळी गेल्याचा आरोप सामाजिक संस्थांनी केला आहे. यानंतर चाकणकर यांनी पीडित जनतेला 'चिल्लर' संबोधल्याचा आरोप आहे. चिल्लर शब्दामुळे संताप वाढला. आंदोलकांनी सांगितले की, वैष्णवीच्या घरी दुःखद प्रसंगी चाकणकर नट्टापट्टा करून भरजरी साडीत गेल्या, ज्यामुळे त्यांना परिस्थितीचे गांभीर्यच नाही, असा आरोप करण्यात आला.

आंदोलनातून राजीनाम्याची मागणी 
       आंदोलनात संगीता तिवारी, शोभा पणीकर, सुनिता नेमूर, रजिया शेख, प्रिया लोंढे, कांबळे ताई यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवाहन करण्यात आले की, महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची गरिमा सांभाळण्यात अपयशी ठरलेल्या रूपाली चाकणकर यांचा तातडीने राजीनामा घ्यावा. तसेच, राजीनामा न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला.

महिला आयोगावर प्रश्नचिन्ह 
          महाराष्ट्रात, विशेषतः पुण्यात, महिलांवरील अत्याचार, घरगुती हिंसा, बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, महिला आयोगाची भूमिका निष्क्रिय असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. चाकणकर यांच्या कार्यशैलीवर टीका करताना, आंदोलकांनी म्हटले की, आयोगाची भीती संपली असून, पीडितांना न्याय मिळत नाही. या आंदोलनाद्वारे महिलांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Edited By: Vinayak Bhise

खबरें और भी हैं

पुण्यात चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी 

Latest News

पुण्यात चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी  पुण्यात चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी 
              वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने पुणे शहर हादरले असताना, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या बेजबाबदार वक्तव्याने संतापाची लाट उसळली
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नारायणगाव पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे लोकार्पण
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांत्वन
तीन वेळा मुलीवर केले अत्याचार ; मठात जुगार, मटक्याची माहिती देणाऱ्या लोकेश्वर स्वामीला ठोकल्या बेड्या
घराच्या बाहेर होते तब्बल 30 साप....लोकांची पळता भुई थोडी

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software