मतदार यादीच्या मुद्द्यावरून खळबळ; संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मतदार याद्यांमधील कथित फेरफार आणि एसआरए घोटाळ्यावरून संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. मुंबईत राजकीय समीकरणांवर चर्चा.

मुंबई: राज्यभरात आगामी राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवास स्थानी जाऊन घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. मतदार याद्यांमधील कथित फेरफार आणि ‘एसआरए’ (SRA/SIR) घोटाळ्यावरून भाजपवर अत्यंत गंभीर आरोप केल्यानंतर संजय राऊत यांनी ही भेट घेतल्यामुळे आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये मतदार यादीतील गैरव्यवहार आणि राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

      काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. नवी मुंबईतील भाजपच्या कार्यालयातून एसआरएसंबंधी ड्युप्लिकेट फॉर्म भरले जात असल्याचा अत्यंत गंभीर दावा त्यांनी केला होता. विरोधकांना मतदान करू शकणाऱ्या विशिष्ट समाजातील आणि घटकांची नावे मतदार यादीतून पद्धतशीरपणे वगळण्याचा भाजपचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप त्यांनी केला होता. निवडणुका जिंकण्यासाठी भाजप सतत नवनवीन मार्ग अवलंबत असून, कधी ईव्हीएम घोटाळे, कधी पैशांचे वाटप तर आता या नव्या प्रक्रियेद्वारे मतदार याद्यांमध्ये पद्धतशीरपणे फेरफार केला जात असल्याचा दावा राऊत यांनी केला होता. या संपूर्ण प्रक्रियेवरच त्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता.

      विशेष म्हणजे, यापूर्वी खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एसआरएच्या प्रक्रियेवर आणि त्यातील त्रुटींवर आक्रमक भूमिका घेत जाहीरपणे प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे मतदार यादीतील कथित गैरप्रकारांच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांची भूमिका एकाच पातळीवर असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन या मुद्द्यावर एकजूट दाखवत सखोल चर्चा केल्याचे समजते. या उच्चस्तरीय भेटीत केवळ मतदार याद्यांचा मुद्दाच नव्हे, तर राज्यातील एकूणच राजकीय वातावरण आणि आगामी रणनीती बाबत काय चर्चा झाली, याविषयी राजकीय वर्तुल्यात तर्कवितर्क लढवले जात आहेत. ही भेट संपल्यानंतर संजय राऊत माध्यमांशी संवाद साधून या बैठकीमागील नेमकी भूमिका स्पष्ट करण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष आता त्यांच्या प्रतिक्रियेकडे लागले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

ममता बॅनर्जींना धक्का? मेघालयात भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ सक्रिय

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software