बातमी प्रसिद्ध केल्याचा राग; कुडाळमध्ये पत्रकाराला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

भंगार व्यावसायिकावर कुडाळ पोलिसांत NC दाखल; पत्रकार वर्गात तीव्र संताप

आनेवाडी सातारा :

पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या बेकायदेशीर भंगार जाळण्याच्या प्रकाराविरोधात आवाज उठवणे एका पत्रकाराला महाग पडले आहे. यासंदर्भातील बातमी आणि व्हिडिओ प्रसारित केल्याचा राग मनात धरून कुडाळ (ता. जावली) येथील पत्रकार प्रसन्न विनायक पवार (वय ३२) यांना अवाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना शनिवारी (२९ ऑगस्ट) दुपारी घडली असून, या प्रकरणी संशयित भंगार व्यावसायिक राधेश्याम मोरया याच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात अदखलपात्र (NC) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

‘प्रसन्ना एक्सप्रेस’वरील बातमीचा राग

मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ परिसरात उघड्यावर भंगार जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचा प्रकार समोर आला होता. या गंभीर समस्येवर प्रकाश टाकणारा व्हिडिओ आणि वृत्त पत्रकार प्रसन्न पवार यांनी दोन दिवसांपूर्वी ‘प्रसन्ना एक्सप्रेस’ या आपल्या यूट्यूब व फेसबुक न्यूज चॅनेलवर प्रसिद्ध केले होते. या बातमीमुळे संबंधित भंगार व्यावसायिक प्रचंड संतप्त झाला होता.

रस्त्यात गाठून धमकी

शनिवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास कुडाळ येथील एम.पी. पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावरून जात असताना राधेश्याम मोरया याने पत्रकार पवार यांना अडवले. “तुला व्हिडिओ टाकायला मीच दिसलो का? यापुढे माझा व्हिडिओ टाकलास तर गाठ गाठीशी आहे,” असे म्हणत त्याने पवार यांच्या अंगावर धावून जात बेधडक शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची थेट धमकी दिली.

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

या अचानक घडलेल्या प्रकारानंतर पत्रकार प्रसन्न पवार यांनी तत्काळ कुडाळ पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली व फिर्याद दिली. पोलिसांनी या घटनेची दखल घेत संशयित राधेश्याम मोरया याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५२, ३५१(२) आणि ३५१(३) अन्वये अदखलपात्र गुन्हा (NCR No. ५८४/२०२६) नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार निकम (बकल क्र. २२१०) करत आहेत.

पत्रकार सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत

सामाजिक आणि पर्यावरणीय समस्येवर परखडपणे प्रकाश झोत टाकणाऱ्या पत्रकाराला अशा प्रकारे धमकावण्याच्या घटनेमुळे जावली तालुक्यातील पत्रकार संघटना आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. पत्रकारांवर होणारे असे हल्ले आणि धमक्यांचा निषेध करत, पत्रकारांना भयमुक्त वातावरणात काम करता यावे यासाठी पोलिसांनी संबंधित आरोपीवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे

Edited By: Nutan Bhise

खबरें और भी हैं

मोहन भागवतांचा टोरंटो मध्ये संदेश; ‘हिंदू जागा झाला तर संपूर्ण जग जागे होईल’

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software