पंतप्रधान निवासाबाहेर काँग्रेसचे अचानक आंदोलन! दिल्ली पोलिसांची पळापळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस नेत्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाढदिवसाचा बहाणा करत थेट पंतप्रधान निवासाबाहेर (7, Lok Kalyan Marg) अचानक धरणे आंदोलन केले. वाचा या धक्कातंत्राची इनसाईड स्टोरी.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी थेट पंतप्रधानांच्या ', लोक कल्याण मार्ग' या अधिकृत निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करून सर्वांनाच धक्का दिला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह काँग्रेसच्या खासदारांनी घडवून आणलेल्या या अचानक आंदोलनामुळे सुरक्षा यंत्रणांची आणि दिल्ली पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. अत्यंत कडक बंदोबस्त आणि सुरक्षा कडेकोट असतानाही काँग्रेसचे वरिष्ठ नेते थेट पंतप्रधानांच्या घरापर्यंत कसे पोहोचले, यामागची एक गुप्त आणि चतुर राजकीय रणनीती आता समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा ८४ वा वाढदिवस होता. याच निमित्ताने दुपारी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते खर्गे यांच्या '१०, राजाजी मार्ग' येथील निवासस्थानी एकत्र जमले. प्रसारमाध्यमे आणि सुरक्षा यंत्रणांना हा केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा आणि बैठकीचा कार्यक्रम वाटला. मात्र, खर्गे आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानातील अंतर अवघे २.३ किलोमीटर असल्याने, आधीच ठरवलेल्या गुप्त प्लॅननुसार सर्व नेत्यांचा ताफा अचानक पंतप्रधान निवासाच्या दिशेने वेगाने रवाना झाला.

संसदेच्या कामकाज स्थगितीनंतर विजय चौकापर्यंत मोर्चा काढण्याची मूळ योजना उघड झाल्याने पोलिसांनी आधीच नाकेबंदी केली होती. त्यामुळे काँग्रेसने ही नवी 'सिक्रेट स्ट्रॅटजी' आखली. सुरक्षेचा मोठा ताफा तैनात असतानाही काँग्रेस नेत्यांनी अचानक केलेल्या या कूचमुळे पोलिसांची पुरती पळापळ झाली आणि त्यांना तातडीने अतिरिक्त कुमक मागवावी लागली. या धक्कातंत्रामुळे काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेत संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

हवामान बदलाच्या संकटात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी! कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुण्यात प्रतिपादन

Latest News

हवामान बदलाच्या संकटात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी! कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुण्यात प्रतिपादन हवामान बदलाच्या संकटात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी! कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुण्यात प्रतिपादन
पुण्यात आयोजित गोवंश संवर्धन परिषदेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वक्तव्य. ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि वीजबिल माफीच्या घोषणांचा पुनरुच्चार.
मराठी भाषेच्या मुद्द्यानंतर आता विद्यार्थ्यांसाठी ठाकरे बंधू एकत्र! मुंबईत भव्य मोर्चाची घोषणा
अतीमुसळधार पावसाचा इशारा! महाराष्ट्रासह ३ राज्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर
दिल्लीतील आंदोलनावरून शिंदे आक्रमक! राहुल गांधींवर लावले गंभीर आरोप
नो-बॉल टाकला तर थेट मॅचमधून आउट! बीसीसीआयचा कठोर नियम

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software