केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या मुलीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग; अखेर इंस्टाग्राम अकाऊंट केले बंद!

दिल्लीतील 'CJP' आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलगी निमिषा प्रधान हिला इंस्टाग्रामवर प्रचंड ट्रोलिंग. ट्रोल्सच्या त्रासाला कंटाळून बंद केले अकाऊंट.

नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाची झळ आता त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचली आहे. आंदोलक आणि सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आता धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी निमिषा प्रधान आली असून, तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. या वाढत्या मनस्तापामुळे आणि ट्रोल्सच्या त्रासाला कंटाळून अखेर तिने आपले इंस्टाग्राम अकाऊंट बंद केले आहे.

'कॉकरोच जनता पार्टी' आणि विद्यार्थ्यांकडून जंतर-मंतरवर शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सातत्याने निदर्शने केली जात आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर निमिषा प्रधान हिच्या परदेशातील शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. अमेरिकेतील टफ्ट्स युनिव्हर्सिटीच्या फ्लेचर स्कूल ऑफ लॉ अँड डिप्लोमेसीमधून पदवी घेतलेल्या निमिषा हिला लक्ष्य करत, युजर्स थेट विद्यापीठाच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर कमेंट्स करत आहेत. तिच्यावर कारवाई करण्याची आणि तिला निलंबित करण्याची मागणी करत युजर्स विद्यापीठाच्या पोस्टवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे मेसेज लिहीत आहेत.

दरम्यान, या संपूर्ण वादात शिक्षणमंत्र्यांच्या कुटुंबाला आणि विशेषतः त्यांच्या मुलीला ओढले जात असल्यावरून सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. काहींच्या मते राजकीय आंदोलनात कौटुंबिक किंवा वैयक्तिक विषयांना आणणे अत्यंत चुकीचे आहे. मात्र, दुसरीकडे सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आंदोलक हे पाऊल उचलत असल्याचे दिसत असून, या घटनेमुळे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांवरील राजकीय आणि सामाजिक दबाव अधिकच वाढला आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

हवामान बदलाच्या संकटात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी! कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुण्यात प्रतिपादन

Latest News

हवामान बदलाच्या संकटात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी! कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुण्यात प्रतिपादन हवामान बदलाच्या संकटात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी! कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुण्यात प्रतिपादन
पुण्यात आयोजित गोवंश संवर्धन परिषदेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वक्तव्य. ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि वीजबिल माफीच्या घोषणांचा पुनरुच्चार.
मराठी भाषेच्या मुद्द्यानंतर आता विद्यार्थ्यांसाठी ठाकरे बंधू एकत्र! मुंबईत भव्य मोर्चाची घोषणा
अतीमुसळधार पावसाचा इशारा! महाराष्ट्रासह ३ राज्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर
दिल्लीतील आंदोलनावरून शिंदे आक्रमक! राहुल गांधींवर लावले गंभीर आरोप
नो-बॉल टाकला तर थेट मॅचमधून आउट! बीसीसीआयचा कठोर नियम

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software