"बांगलादेशासारखे हाल होतील!" जंतर-मंतरवरील आंदोलनात धक्कादायक वक्तव्य; व्हिडिओ व्हायरल

दिल्लीच्या जंतर-मंतरवर NEET आंदोलनादरम्यान "बांगलादेशासारखे हाल होतील" या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल. आंदोलनाला राजकीय आणि प्रक्षोभक वळण लागल्याचा आरोप; पोलिसांकडून चौकशी सुरू.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात 'नीट' परीक्षा गैरव्यवहाराविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी' आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच एक अत्यंत धक्कादायक आणि वादग्रस्त व्हिडिओ समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या आंदोलनात सहभागी एका तरुणाने व्यासपीठावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बांगलादेशात झालेल्या राजकीय उलथापालथीचा उल्लेख करत, भारतामध्येही तशीच परिस्थिती निर्माण होईल आणि हा तर फक्त 'ट्रेलर' आहे, असा थेट इशारा या तरुणाने भाषणादरम्यान दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर आता या आंदोलनाच्या मूळ हेतूवरच अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित तरुण आक्रमक भाषेत उपस्थितांशी संवाद साधताना दिसत आहे. देशात सध्या सुरू असलेले आंदोलन म्हणजे केवळ सुरुवात असून अजून 'खरा पिक्चर' बाकी आहे, असे सांगत त्याने प्रक्षोभक विधाने केली. बांगलादेशात ज्याप्रमाणे तीव्र आंदोलनानंतर सत्ताधाऱ्यांना देश सोडून दुसऱ्या देशात आश्रय घ्यावा लागला, तशीच वेळ इथेही येईल, अशा प्रकारची भाषा त्याने वापरली आहे. या प्रक्षोभक वक्तव्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिक आणि राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच हा तरुण आम आदमी पार्टीशी संबंधित नेता चौधरी ओवैस असल्याचा दावाही सोशल मीडियावर केला जात आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कासाठी आणि 'नीट' पेपरफुटीच्या निषेधार्थ सुरू असलेल्या या आंदोलनाला अचानक हिंसक आणि राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. आधीच संसदेवरील मोर्चामुळे चिघळलेल्या या आंदोलनात आता बांगलादेशासारख्या देशविरोधी परिस्थितीचा संदर्भ आल्यामुळे सुरक्षेचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या वादग्रस्त वक्तव्यावर प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

हवामान बदलाच्या संकटात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी! कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुण्यात प्रतिपादन

Latest News

हवामान बदलाच्या संकटात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी! कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुण्यात प्रतिपादन हवामान बदलाच्या संकटात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी! कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुण्यात प्रतिपादन
पुण्यात आयोजित गोवंश संवर्धन परिषदेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वक्तव्य. ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि वीजबिल माफीच्या घोषणांचा पुनरुच्चार.
मराठी भाषेच्या मुद्द्यानंतर आता विद्यार्थ्यांसाठी ठाकरे बंधू एकत्र! मुंबईत भव्य मोर्चाची घोषणा
अतीमुसळधार पावसाचा इशारा! महाराष्ट्रासह ३ राज्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर
दिल्लीतील आंदोलनावरून शिंदे आक्रमक! राहुल गांधींवर लावले गंभीर आरोप
नो-बॉल टाकला तर थेट मॅचमधून आउट! बीसीसीआयचा कठोर नियम

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software