बनावट सोन्याच्या बिस्किटांद्वारे फसवणूक करणारा आरोपी जेरबंद

 

 

पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बनावट सोन्याच्या बिस्किटांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून बनावट सोन्यासारखी दिसणारी बिस्किटे आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या आदेशानुसार फरारी व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुसार पोलिस अंमलदार नितीन मुंडे व काशिनाथ कारखिले हे हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली.

 

या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिलीप विश्वनाथ स्वामी उर्फ जयदेव (वय ५२, रा. जळकोट, जि. लातूर) या आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने दिनांक २४ जुलै २०२५ रोजी प्रेमळ विठ्ठल मंदिराजवळ पुणे येथे एका व्यक्तीस बनावट सोन्याची बिस्किटे दाखवून फसवणूक केल्याची कबुली दिली.

 

या प्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीकडून दोन बनावट सोन्याच्या बिस्किटांसारख्या दिसणाऱ्या पिवळ्या धातूच्या वस्तू आणि एक चेन जप्त करण्यात आली आहे.

 

तपासादरम्यान आरोपीने सातारा जिल्ह्यातील कराड येथेही अशाच प्रकारे एका महिलेची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कराड सिटी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अपहरण, अ‍ॅट्रॉसिटी व फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

या कारवाईत आरोपीकडून सुमारे १२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

ही कारवाई पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राम राजमाने, पोलिस उपनिरीक्षक गौरव देव, नितीन मुंडे, काशिनाथ कारखिले व त्यांच्या पथकाने केली.

Edited By: Nutan Bhise

खबरें और भी हैं

माणदेशात रंगणार 'शिवराज्याभिषेक' सोहळ्याचा अभूतपूर्व सोहळा ; २५ आणि २६ एप्रिल रोजी सादरीकरण

Latest News

माणदेशात रंगणार 'शिवराज्याभिषेक' सोहळ्याचा अभूतपूर्व सोहळा ; २५ आणि २६ एप्रिल रोजी सादरीकरण माणदेशात रंगणार 'शिवराज्याभिषेक' सोहळ्याचा अभूतपूर्व सोहळा ; २५ आणि २६ एप्रिल रोजी सादरीकरण
​दहिवडी दि .२४:        माणदेशाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला उजाळा देण्यासाठी 'कथा शिवराज्याभिषेकाची' या महासोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात फीवाढीविरोधात विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; प्रशासनाकडून आश्वासन
पाण्याच्या टंचाईवर विद्यार्थ्यांचा संताप; पुणे विद्यापीठात ठिय्या आंदोलन
फलटण दहिवडी महामार्ग कंपनीला ३३ कोटी ४० लाखांचा दंड...
पुणे जिल्ह्यातील  तहसील कार्यालयात एजंटसह दोघांना एसीबीकडून रंगेहात अटक

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software