राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सातारा संघास उवविजेतेपद; मिहीर काटकर मालिकावीर तर लंबोदर निकम उत्कृष्ट गोलंदाज

दहिवडी: टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 6 वी 14 वर्षाखालील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा नाशिक या ठिकाणी टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया व महाराष्ट्र सचिव आदरणीय मिनाक्षी गिरी, उपाध्यक्ष विलास गिरी, वूमन डायरेक्टर धनश्री गिरी महाराष्ट्र सहसचिव चंद्रकांत तोरणे यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली

   या स्पर्धेमध्ये लंबोदर निकम च्या नेतृत्वाखाली सातारा संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती परंतु त्यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. सातारा संघाने साखळी सामन्यांमध्ये सांगली, नाशिक, धुळे या संघावर मात करत बाद फेरीमध्ये प्रवेश मिळवला होता, अंतिम सामना नाशिक शहर या संघाबरोबर अतिशय अटीतटीचा झाला व यामध्ये सातारा संघाचा निसटता पराभव झाला, सातारा संघातील खेळाडू मिहीर काटकर यास मालिकावीर तर लंबोदर निकम यास उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मिहीर काटकर हा क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी प्राथमिक शाळा म्हसवडचा खेळाडू असून तुकाराम घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे तर लंबोदर निकम हा सनशाइन इंग्लिश मीडियम स्कूल खटाव चा खेळाडू असून विशाल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करत आहे. या संघास प्रशिक्षक विशाल निकम सर, महेश सोनवले विकास सरतापे महाराष्ट्र राज्य सहसचिव चंद्रकांत तोरणे यांचे मार्गदर्शन लाभले,
    संघाच्या या यशाबद्दल टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सचिव मीनाक्षी गिरी उपाध्यक्ष विलास गिरी उमन डायरेक्टर धनश्री गिरी सहसचिव चंद्रकांत तोरणे, कृषिरत्न,प्रा. विश्वंभर बाबर, आदर्श मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, महेश सोनवले,विकास सरतापे,यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Edited By: Nutan Bhise

खबरें और भी हैं

ग्रंथ निर्मिती ही कलेबरोबरच समाजाला एकत्र बांधणारी असावी - लेखक ऍड. शंकर निकम

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software