गोंदवले बु!येथे अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला; वारसांचा शोध सुरू

​दहिवडी दि .१२:
माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ असलेल्या नम्रता सर्व्हिसिंग सेंटरच्या पूर्व बाजूला एका ६५ वर्षीय अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची नोंद दहिवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस सध्या मृताच्या वारसांचा शोध घेत आहेत.
​मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९:३४ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. प्रवीण लालासो भोसले (वय ४५, रा. गोंदवले बुद्रुक) यांनी या घटनेची खबर दहिवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची (रजि. नंबर १८/२०२५) नोंद केली आहे.
​    मयत व्यक्तीचे वय साधारण ६५ वर्षे असून, उंची ५ फूट आहे. त्यांचा रंग सावळा, चेहरा गोल आणि नाक सरळ आहे. मृतदेह आढळला तेव्हा त्यांच्या अंगात खालीलप्रमाणे कपडे होते:
​वरचा पेहराव: पांढऱ्या रंगाचा शर्ट, ज्यावर छातीवर व पोटावर फाटलेले राखाडी रंगाचे जॅकेट होते.
​खालचा पेहराव: काळ्या रंगाची पॅन्ट.
​इतर: पायात काळ्या रंगाचे सॉक्स आणि प्लास्टिकचे काळ्या रंगाचे बूट होते, ज्यावर 'TIGER' असे लिहिलेले आहे.
 
        ​सदर अनोळखी मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. वरील वर्णनाशी जुळणारी कोणतीही व्यक्ती बेपत्ता असल्यास किंवा या मृताबाबत कोणाला काही माहिती असल्यास, त्यांनी त्वरित दहिवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि. दत्तात्रेय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रवी खाडे करत आहेत 
 
Edited By: Nutan Bhise

खबरें और भी हैं

माणदेशात रंगणार 'शिवराज्याभिषेक' सोहळ्याचा अभूतपूर्व सोहळा ; २५ आणि २६ एप्रिल रोजी सादरीकरण

Latest News

माणदेशात रंगणार 'शिवराज्याभिषेक' सोहळ्याचा अभूतपूर्व सोहळा ; २५ आणि २६ एप्रिल रोजी सादरीकरण माणदेशात रंगणार 'शिवराज्याभिषेक' सोहळ्याचा अभूतपूर्व सोहळा ; २५ आणि २६ एप्रिल रोजी सादरीकरण
​दहिवडी दि .२४:        माणदेशाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला उजाळा देण्यासाठी 'कथा शिवराज्याभिषेकाची' या महासोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात फीवाढीविरोधात विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; प्रशासनाकडून आश्वासन
पाण्याच्या टंचाईवर विद्यार्थ्यांचा संताप; पुणे विद्यापीठात ठिय्या आंदोलन
फलटण दहिवडी महामार्ग कंपनीला ३३ कोटी ४० लाखांचा दंड...
पुणे जिल्ह्यातील  तहसील कार्यालयात एजंटसह दोघांना एसीबीकडून रंगेहात अटक

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software