पाण्याच्या टंचाईवर विद्यार्थ्यांचा संताप; पुणे विद्यापीठात ठिय्या आंदोलन

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. मागील सुमारे पंधरा दिवसांपासून कॅम्पसमध्ये पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा होत नसल्याची तक्रार विद्यार्थी सातत्याने करत होते. मात्र, या तक्रारींकडे विद्यापीठ प्रशासनाने पुरेशी दखल घेतली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
        उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली असताना विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये पाण्यासाठी इकडून-तिकडे भटकावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत गेला. अखेर या समस्येवर तातडीने तोडगा काढावा, या मागणीसाठी National Students' Congress आणि इतर समविचारी विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
      विद्यार्थ्यांनी १९ एप्रिल रोजी विद्यापीठातील जयकर ग्रंथालय परिसरात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By: Nutan Bhise

खबरें और भी हैं

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी: ४ चोरीच्या दुचाकींसह संशयित जेरबंद, ४ गुन्हे उघडकीस

Latest News

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी: ४ चोरीच्या दुचाकींसह संशयित जेरबंद, ४ गुन्हे उघडकीस सातारा पोलिसांची मोठी कामगिरी: ४ चोरीच्या दुचाकींसह संशयित जेरबंद, ४ गुन्हे उघडकीस
सातारा: सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे  (डी.बी.) पथकाने धडक कारवाई करत दुचाकी चोरी करणाऱ्या एका संशयित आरोपीला अटक केली आहे....
​हडपसर महावितरणचा क्लास-१ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; १२ वीज मीटर जोडणीसाठी मागितली होती लाच
लोणी काळभोर येथील ग्राम महसूल अधिकारी १ लाखाची लाच मागितल्याप्रकरणी जाळ्यात; एसीबीची मोठी कारवाई
सातारा जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा! अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स की 'लूटमारीची' दुकाने? 'पांढऱ्या कपड्यातील देवदूतांच्या' वाढत्या व्यावसायिकतेवर जनतेचा संतप्त सवाल!

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software