ओबीसींच्या हक्कासाठी नवा राजकीय मंच! लक्ष्मण हाकेंकडून 'ओबीसी जनता पार्टी'ची घोषणा

बारामती:

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे प्रमुख नेते लक्ष्मण हाके यांनी अखेर प्रत्यक्ष राजकारणाच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी 'ओबीसी जनता पार्टी' या नव्या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली. राज्य सरकार आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल करत त्यांनी भाजपवर हुकूमशाही पद्धतीने कारभार करण्याचा आणि लोकशाहीतील विरोधी आवाज दडपण्याचा गंभीर आरोप केला आहे. लक्ष्मण हाके यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात, विशेषतः ओबीसी राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे.

बारामतीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना लक्ष्मण हाके यांनी आरोप केला की, भाजप सरकार राज्यातील सर्व प्रकारची लोकशाही आंदोलने चिरडण्याचे काम करत आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मांडण्याचा अधिकार असतानाही सरकार विरोधी भूमिका घेणाऱ्यांना लक्ष्य करत असल्याचा दावा त्यांनी केला. ओबीसी समाजाच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगत त्यांनी ओबीसी महामंडळांना वेळेवर पुरेसा निधी दिला जात नसल्याची खंत व्यक्त केली. तसेच, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक योजनांना आर्थिक तरतूद न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगत त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना सवाल करत या योजनांसाठी आणि महामंडळांसाठी कधी निधी देणार असा जाब विचारला.

आपल्या नव्या राजकीय पक्षाच्या ध्येयधोरणांबाबत स्पष्टीकरण देताना हाके म्हणाले की, 'ओबीसी जनता पार्टी'ची स्थापना कोणाला आमदार, खासदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री बनवण्यासाठी झालेली नाही. हा पक्ष सर्वसामान्य जनतेचे आणि ओबीसी समाजाचे हक्क मिळवून देण्यासाठी काम करेल. कोणाचे लाड पुरवण्यासाठी किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी हा पक्ष स्थापन झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात या पक्षाच्या माध्यमातून राज्यभरात भक्कम संघटनात्मक बांधणी केली जाईल आणि ओबीसींच्या लढ्याला अधिक तीव्र केले जाईल, असे त्यांनी सांगितले. हाके यांच्या या नव्या राजकीय इनिंगमुळे आगामी निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

बेरोजगार सेवा सहकारी संस्थांसाठी खूशखबर! विनानिविदा कामांच्या वाटपाची प्रक्रिया सुरू

Latest News

बेरोजगार सेवा सहकारी संस्थांसाठी खूशखबर! विनानिविदा कामांच्या वाटपाची प्रक्रिया सुरू बेरोजगार सेवा सहकारी संस्थांसाठी खूशखबर! विनानिविदा कामांच्या वाटपाची प्रक्रिया सुरू
मुंबई: मुंबई शहरातील बेरोजगार सेवा सहकारी संस्थांसाठी नोकरी व व्यवसायाची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार...
मुंबईत २३ जुलैपासून कलम १४४ लागू; २ आठवडे पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यावर बंदी
मराठी भाषा आणि बोलींच्या जतनासाठी नवीन योजना! परदेशात ७५ 'बृहन्महाराष्ट्र मंच' उभारणार
सातारा-फलटण मार्गावर शिवथर येथे धडक कारवाई; कंटेनर भरून बनावट दारू पकडली
वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! देशभरात MBBS च्या ९,९११ नव्या जागांना मंजुरी

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software