Pune Crime News: पुण्यात थरारक सत्र! एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार; एकावर प्राणघातक हल्ला तर अल्पवयीन मुलांकडून दहशत

पुण्यातील खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबाराची दोन सत्रे! पूर्ववैमनस्यातून तरुणावर ३ गोळ्या झाडल्या, सायंकाळी अल्पवयीन मुलांकडून हवेत गोळीबार.

पुणे: विद्येचे माहेरघर आणि शांत समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबाराच्या थरारक घटना घडल्या आहेत. एका बाजूला पूर्ववैमनस्यातून भरदिवसा एका तरुणावर जीवघेणा हल्ला करत गोळ्या झाडण्यात आल्या, तर दुसरीकडे सायंकाळी अल्पवयीन मुलांनी परिसरात दहशत पसरवण्यासाठी हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लागोपाठ घडलेल्या या दोन्ही हिंसक घटनांमुळे खडक आणि घोरपडे पेठ परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास घोरपडे पेठ पोलीस चौकीसमोरच गोळीबाराची पहिली घटना घडली. जुन्या भांडणांच्या वादातून सुजल सुनील परदेशी आणि यश चंदन परदेशी हे दोघे जण दुचाकीवरून आले आणि त्यांनी नुरु शेख या तरुणावर थेट ३ गोळ्या झाडल्या. या अचानक झालेल्या हल्ल्यात नूर शेख हा गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि फॉरेन्सिक पथकाच्या साहाय्याने पंचनामा करत पुराव्यांची संकलित तपासणी सुरू केली.

या पहिल्या घटनेची धग समजत नाही तोच, सायंकाळच्या सुमारास याच परिसतात गोळीबाराची आणखी एक घटना घडली. स्वारगेटहून लोहियानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गल्ली क्रमांक तीन आणि नऊच्या परिसरात तिघा अल्पवयीन मुलांनी दुचाकीवरून जात असताना हवेत अंदाधुंद गोळीबार केला. परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानेच हा प्रकार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. खडक पोलीस ठाण्याच्या पथकाने या दोन्ही घटनांच्या ठिकाणचे पंचनामे पूर्ण केले असून, फरारी आरोपींचा आणि अल्पवयीन मुलांचा कसून शोध घेतला जात आहे. एकाच दिवसात घडलेल्या या दोन गोळीबाराच्या सत्रामुळे पुणे पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

काही तासांतच मोठा फेरबदल! धर्मेंद्र प्रधान यांच्या एक्झिटनंतर 'हे' निष्ठावंत नेते बनले देशाचे नवे शिक्षण मंत्री

Latest News

काही तासांतच मोठा फेरबदल! धर्मेंद्र प्रधान यांच्या एक्झिटनंतर 'हे' निष्ठावंत नेते बनले देशाचे नवे शिक्षण मंत्री काही तासांतच मोठा फेरबदल! धर्मेंद्र प्रधान यांच्या एक्झिटनंतर 'हे' निष्ठावंत नेते बनले देशाचे नवे शिक्षण मंत्री
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळात एक मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच...
खंडाळा पोलिसांची मोठी कारवाई; गांजाची अवैध शेती उध्वस्त, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त
गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल; गोकुळाष्टमीपूर्वी मिळणार दिलासा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन; हजारो शेतकऱ्यांना मिळणार सिंचनाचा लाभ
महाराष्ट्राला बसले भूकंपाचे धक्के; नाशिक आणि पालघरमध्ये जमिनीखालून हालचाली, नागरिक झाले भयभीत

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software