खंडाळा पोलिसांची मोठी कारवाई; गांजाची अवैध शेती उध्वस्त, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

खंडाळा पोलिसांनी मुंडाळवाडीत धाड टाकून गांजाची अवैध शेती उद्ध्वस्त केली. रोकड आणि चारचाकीसह ६.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक.

दहिवडी: सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत खंडाळा तालुक्यातील मुंडाळवाडी परिसरात गांजाची अवैध लागवड उघडकीस आणली. या कारवाईत सुमारे ८० ग्रॅम गांजा, ₹,६३,३०० किमतीची रोख रक्कम आणि ३ लाख किमतीची चारचाकी असा एकूण ६.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलै रोजी रात्री मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार खंडाळा पोलिसांनी सापळा रचला. संशयिताच्या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये गांजा तसेच रोख रक्कम आढळून आली. त्यानंतर पुढील तपासात संबंधित ठिकाणी गांजाची लागवड केल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी संशयिताविरुद्ध अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act), १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक धनंजय गोरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र जे. जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत खंडाळा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

खंडाळा पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायात गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली असून, जिल्ह्यात अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

काही तासांतच मोठा फेरबदल! धर्मेंद्र प्रधान यांच्या एक्झिटनंतर 'हे' निष्ठावंत नेते बनले देशाचे नवे शिक्षण मंत्री

Latest News

काही तासांतच मोठा फेरबदल! धर्मेंद्र प्रधान यांच्या एक्झिटनंतर 'हे' निष्ठावंत नेते बनले देशाचे नवे शिक्षण मंत्री काही तासांतच मोठा फेरबदल! धर्मेंद्र प्रधान यांच्या एक्झिटनंतर 'हे' निष्ठावंत नेते बनले देशाचे नवे शिक्षण मंत्री
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळात एक मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच...
खंडाळा पोलिसांची मोठी कारवाई; गांजाची अवैध शेती उध्वस्त, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त
गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल; गोकुळाष्टमीपूर्वी मिळणार दिलासा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन; हजारो शेतकऱ्यांना मिळणार सिंचनाचा लाभ
महाराष्ट्राला बसले भूकंपाचे धक्के; नाशिक आणि पालघरमध्ये जमिनीखालून हालचाली, नागरिक झाले भयभीत

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software