पीएसीएल कंपनीतील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे आवाहन; परताव्यासाठी ६ ऑगस्टपर्यंत त्रुटी दुरुस्त करण्याचे आवाहन

PACL मधील गुंतवणूकदारांना परतावा मिळवण्यासाठी ६ ऑगस्ट २०२६ पर्यंत SEBI पोर्टलावर त्रुटी दुरुस्त करण्याचे सातारा पोलीस आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन.

सातारा:सातारा येथील पी.ए.सी.एल. लिमिटेड (पर्ल अ‍ॅग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेड) या कंपनीत आर्थिक गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांसाठी सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेने महत्त्वाचे आवाहन केले आहे. ज्या गुंतवणूकदारांना परतावा मिळालेला नाही, त्यांनी ६ ऑगस्ट २०२६ पर्यंत संकेतस्थळावर आवश्यक त्रुटी दुरुस्त करून परताव्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पीएसीएल कंपनीतील गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, या प्रकरणाचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा यांच्याकडे सुरू आहे.

या प्रकरणातील गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) आर. एम. लोढा समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीच्या माध्यमातून देशभरातील पात्र गुंतवणूकदारांना परतावा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

यासाठी www.sebipaclrefund.co.in हे संकेतस्थळ तयार करण्यात आले असून, परताव्याची सद्यस्थिती तपासण्यासाठी https://www.sebipaclrefund.co.in/Refund/Enquiry ही सुविधा उपलब्ध आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे ज्या गुंतवणूकदारांना अद्याप परतावा मिळालेला नाही, त्यांनी ६ ऑगस्ट २०२६ पर्यंत संकेतस्थळावर लॉग-इन करून आवश्यक त्रुटी दूर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच, ऑनलाइन प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण आल्यास संबंधित गुंतवणूकदारांनी न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) आर. एम. लोढा समितीचे नोडल अधिकारी व सचिव यांच्याशी संपर्क साधावा, असेही आर्थिक गुन्हे शाखेने स्पष्ट केले आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने पीएसीएल कंपनीतील सर्व गुंतवणूकदारांनी ही संधी न दवडता वेळेत आवश्यक कार्यवाही करून आपल्या परताव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पीएसीएल कंपनीतील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे आवाहन; परताव्यासाठी ६ ऑगस्टपर्यंत त्रुटी दुरुस्त करण्याचे आवाहन

Latest News

पीएसीएल कंपनीतील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे आवाहन; परताव्यासाठी ६ ऑगस्टपर्यंत त्रुटी दुरुस्त करण्याचे आवाहन पीएसीएल कंपनीतील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे आवाहन; परताव्यासाठी ६ ऑगस्टपर्यंत त्रुटी दुरुस्त करण्याचे आवाहन
PACL मधील गुंतवणूकदारांना परतावा मिळवण्यासाठी ६ ऑगस्ट २०२६ पर्यंत SEBI पोर्टलावर त्रुटी दुरुस्त करण्याचे सातारा पोलीस आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन....
MPSC पेपरफुटीवरील पोस्ट महागात; हर्षवर्धन सपकाळांविरोधात गुन्हा
भारतातून बांगलादेशात परतण्याची शेख हसीनांची तयारी; आत्मसमर्पणाची व्यक्त केली इच्छा
दिल्लीतील नीट आंदोलनावरून राजकीय वाद; राहुल गांधींचे अमित शाहांवर गंभीर आरोप
भाडेकरूंची माहिती देणे बंधनकारक; पुणे पोलिसांची घरमालकांना कडक सूचना

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software