नाशिकमध्ये ३९ अनुकंपा नियुक्त्या; महाजनांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात ३९ अनुकंपा धारकांना सेवेची नियुक्तीपत्रे प्रदान. मंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला.

नाशिक: भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण सोहळा पार पडला. स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्ह्यातील ३९ अनुकंपा धारकांना अधिकृत शासकीय सेवाप्रवेशाची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत ही नियुक्तीपत्रे सुपूर्द करण्यात आल्यामुळे अनेक कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंदाचे अश्रू आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

          या दिमाखदार सोहळ्यास महापौर हिमगौरी आडके, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनासारख्या राष्ट्रीय पर्वावर शासकीय सेवा लाभल्यामुळे या तरुण-तरुणींच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली आहे.

        कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती देताना सांगितले की, सध्या नाशिक जिल्ह्यात अनुकंपा तत्त्वावरील एकही प्रकरण प्रलंबित ठेवण्यात आलेले नाही. प्रशासनाने पारदर्शक आणि कालमर्यादित पद्धतीने पाठपुरावा करून सर्व पात्र वारसांना न्याय देण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. प्रशासनाच्या या गतिमान आणि संवेदनशील कार्यपद्धतीचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

विविध विभागांत ३९ जणांना नियुक्ती

विविध शासकीय विभागांतर्गत अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळवलेल्या उमेदवारांमध्ये शितल प्रतापपुरी गोसावी, साधना रमेश बनकर, शैलेश अशोक दराडे, यश विश्वनाथ कुन्हाडे, कोमल अशोक शिंदे, हेमंत मारुती भाकरे, मयुर परशुराम सायखेडे, सिद्धेश मनेश पोतदार, नेहा योगेश गवळी, निरज पुरुषोत्तम परदेशी, मंगेश संजय पाटील, अश्विनी नरेश चौधरी, शुभम संदिप निकम, जोएल राजेश वाघमारे, रोशनी बाबाजी शेवाळे, धीरज योगेश खैरणार, पुजा अमोल पवार, सनी ज्ञानेश्वर तांदळे, चेतना अजय तायडे, जुनेरा साजीद मनियार, रोहित गोरक्ष जाधव, प्रणव संजय अहिरराव, वैशाली केशव चौधरी, प्रतिक मोहन ओहोळ, युवराज अभिजीत कपाटे, कृष्णा राजेंद्र कदम, अभिजित शरद राऊत, मनोहर शिवाजी गांगुर्डे, योगेश बाळु मुंजे, राहुल राजेश संघानशिव, अजय सदाशिव दोंदे, रामदास दशरथ तिखांडके, ज्योती उत्तम चेबाळे, टिनुराज प्रदिप व्यवहारे, मानसी समाधान आहेर, अजरउद्दीन सलीम शेख, राहुल मधुकर ठाकरे, तेजस्वी निळकंठ यादव आणि वर्षा सागर पाटील यांचा समावेश आहे. या सर्व नवयुक्तांना जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये सामावून घेण्यात आले असून, कार्यक्रमास उपस्थित कुटुंबीय व नातेवाईकांनी शासनाच्या या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पोलिस मुख्यालयासाठी जमीन मंजूर

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software