- Hindi News
- देश
- नवी दिल्लीतील दोन्ही महाराष्ट्र सदनांमध्ये स्वातंत्र्यदिन अतिशय उत्साहात साजरा; निवासी आयुक्त डॉ. श्...
नवी दिल्लीतील दोन्ही महाराष्ट्र सदनांमध्ये स्वातंत्र्यदिन अतिशय उत्साहात साजरा; निवासी आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण
नवी दिल्लीतील कोपर्निकस मार्ग आणि कस्तुरबा गांधी मार्ग येथील महाराष्ट्र सदनांमध्ये स्वातंत्र्यदिनी डॉ. श्वेता सिंघल यांच्या हस्ते ध्वजारोहण.
नवी दिल्ली: भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत राजधानी नवी दिल्लीतील कोपर्निकस मार्ग आणि कस्तुरबा गांधी मार्ग येथील दोन्ही महाराष्ट्र सदनांमध्ये स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांच्या हस्ते दोन्ही महाराष्ट्र सदनांमध्ये दिमाखात राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहण सोहळ्यानंतर महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या शिस्तबद्ध पथकाने राष्ट्रध्वजाला मानद वंदना देत आकर्षक पथसंचलन केले. याप्रसंगी डॉ. श्वेता सिंघल यांनी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. राजधानी दिल्लीतील या महत्त्वाच्या सोहळ्याला निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, महाराष्ट्र सदनचे सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. गंगवार, लेखा अधिकारी निलेश केदारे, व्यवस्थापक प्रमोद कोलपते, सारिका शेलार, प्रियंका नागे, सुरक्षा सहाय्यक अधिकारी अनिल चोरगे यांच्यासह नवी दिल्लीतील महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीच्या आणि चैतन्यमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे दिल्लीतील महाराष्ट्र सदन परिसर अभिमानाने भारून गेला होता.
