- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेवर १४ नव्या सदस्यांची नियुक्ती
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेवर १४ नव्या सदस्यांची नियुक्ती
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (MMC) १४ नव्या सदस्यांची घोषणा. शासनाकडून ५ नामनिर्देशित तर ९ सदस्यांची निवडणुकीद्वारे निवड.
मुंबई: राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातर्फे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या १४ नव्या सदस्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५ मधील तरतुदीं नुसार या संदर्भातील अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली असून, हे सर्व नवनियुक्त सदस्य अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून पुढील पाच वर्षे पदावर कार्यरत राहणार आहेत.
या नवीन कार्यकारिणीत शासनाकडून नामनिर्देशित करण्यात आलेल्या ५ सदस्यांचा आणि नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी निवडणुकीद्वारे निवडून दिलेल्या ९ सदस्यांचा समावेश आहे.
शासनाकडून नामनिर्देशित सदस्य:
- डॉ. अजय गोविंद केणी
- डॉ. राहुल कुलकर्णी
- डॉ. प्रशांत नारायण चौधरी
- डॉ. राजीव येरवडेकर
- डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर
नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांमधून निवडून आलेले सदस्य:
- डॉ. संतोष अप्पासाहेब कदम
- डॉ. संजय साहेबराव कदम
- डॉ. निलेश वसंतराव निकम
- डॉ. संजय गणेशराव देशपांडे
- डॉ. सुनील माधवराव इंगळे
- डॉ. अनिलकुमार भास्कर पाटील
- डॉ. मंगेश मधुकर गुलवाडे
- डॉ. उज्ज्वला किशनराव कराड
- डॉ. अनिल शंकर पाचनेकर
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या या नवनियुक्त सर्व सदस्यांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या आगमनाने वैद्यकीय क्षेत्रातील प्रशासकीय व नियमन प्रक्रियेला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
