हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देणार; योगेश कदमांचे निर्देश

पिंपरीतील हाफकिन संस्थेची राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून पाहणी. 'अँटी-स्नेक व्हेनम सीरम'चे उत्पादन वाढवणे व निधीचा प्रश्न सोडवण्याचे आदेश.

पिंपरी: ऐतिहासिक आणि आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान असलेल्या हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाला त्याचे गतवैभव पुनश्च मिळवून देण्यासाठी राज्य शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्यमंत्री योगेश कदम यांनी केली आहे. पिंपरी येथील हाफकिन प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी उत्पादन विभाग, सर्पालय, अश्व संवर्धन विभाग आणि अत्याधुनिक प्रयोगशाळेची पाहणी करत संपूर्ण कामकाजाचा सखोल आढावा घेतला.

      या पाहणी दौऱ्या दरम्यान राज्यमंत्री योगेश कदम यांनी हाफकिन संस्थेची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी तातडीने एक प्रभावी कृती आराखडा तयार करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. विशेषतः, ‘अँटी-स्नेक व्हेनम सीरम’चे (सर्पदंशावरील लस) उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच, राज्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश उपचारासाठी आवश्यक असणारी किट तात्काळ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हाफकिन संस्थेच्या प्रलंबित निधी बाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून, यासाठी केंद्र शासना कडेही पाठपुरावा तीव्र केला जाणार आहे. संस्थेच्या विविध प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय घेण्यासाठी पुढील आठवड्यात मंत्रालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.

     हाफकिन संस्थेकडे असलेली प्रदीर्घ परंपरा, तांत्रिक क्षमता आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांचा योग्य व प्रभावी वापर करून या संस्थेला पूर्वीसारखा सुवर्णकाळ प्राप्त करून दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या उच्चस्तरीय पाहणी दौऱ्यात अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त हुकरे, हाफकिनचे महाव्यवस्थापक धीवर, पिंपरी विभाग व्यवस्थापक डॉ. बाबासाहेब कुरहे यांच्यासह महामंडळाचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

विनोद तावडेंना भाजपकडून मोठी जबाबदारी; यूपी निवडणुकीची धुरा

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software