- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृण हत्या
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृण हत्या
स्कुटी पार्किंच्या वादातून आसिफ कुरेशीवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी दोन जणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज दोघांनाही न्यायालयात हजर केले जाणार आहे.

बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या करण्यात आली आहे. ही घटना काल रात्रीच्या सुमारास दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. स्कुटी पार्किंच्या वादातून हा प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला. दरम्यान आसिफ कुरेशी व आरोपी यांच्यात स्कुटी पार्किंग वरून बाचाबाची झाली. आसिफने आरोपींना घराबाहेरील गेट समोर स्कुटी पार्क करू नका असे सांगितले असता दोघांनी वाद घालण्यास सुरुवात केली व रागातून आसिफ वर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याच्या शरीरावर अनेक जखमा केल्याने भरपूर रक्तस्त्राव झाला.
आसिफला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारापूर्वीच आसिफ कुरेशी मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आसिफ वर हल्ला केलेल्या दोघांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून हत्ये मध्ये वापरलेली शस्त्रे जप्त केली आहेत. दोन्ही आरोपीना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून घटनेचा पुढील तपास सुरु आहे.