10 मीटर एअर रायफल स्पर्धेत हरियाणाच्या दीपक सैनीला सुवर्ण पदक

एजीसी स्पोर्टस पॅरा खेलोत्सव पॅरा एडिशन २०२५ दिवस सातवा

पुणे: श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे येथे सुरू असलेल्या एजीसी स्पोर्टस  पॅरा एडिशन २०२५ मध्ये रविवारी झालेल्या पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग (SH1) स्पर्धेत हरियाणाच्या दीपक सैनीने सुवर्ण पदकाची कमाई केली. तसेच या स्पर्धेत कर्नाटकाच्या राकेश एन. निदागुंडी याने रौप्य पदक तर कर्नाटकाच्याच सचिन सिद्दन्नावर याने कांस्य पदक पटकावले. विशेष म्हणजे शेवटच्या फेरीपर्यंत अंतिम सामना चुरशीचा रंगला होता. यात हरियाणाच्या दीपक सैनीने अफलातून नेमबाजी करत सुवर्ण पदक आपल्या नावावर केले.

       ११ ऑगस्टपासून सुरू झालेली एजीसी स्पोर्टस  पॅरा एडिशन २०२५ ही स्पर्धा पॅरा ॲथलिट्सना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मोठे व्यासपीठ ठरत आहे. विविध राज्यांतील पॅरा खेळाडू यात सहभागी झाले असून, त्यांच्या खेळातील जिद्दीमुळे स्पर्धेला वेगळाच रंग आला आहे. या स्पर्धेचा समारोप उद्या, १८ ऑगस्ट रोजी होणार असून विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे अंतिम सामने पाहण्यासाठी जास्तीत जास्त पुणेकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

कोल्हापूरमध्ये दोन गटात राडा...जमावाने गाडयांना लावली आग

Latest News

कोल्हापूरमध्ये दोन गटात राडा...जमावाने गाडयांना लावली आग कोल्हापूरमध्ये दोन गटात राडा...जमावाने गाडयांना लावली आग
कोल्हापूर: राजेबागस्वर फुटबॉल क्लबच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शनिवारी संध्याकाळी सिद्धार्थनगर...
वेदावती हायस्कूलच्या  मैदानाची त्रिमुर्ती उद्योग समूहाकडून  स्वच्छता 
बिजवडी केंद्रातील सर्व शाळांचे वारुगड दर्शन  विद्यार्थ्यांनी लुटला वर्षा सहलीचा आनंद
नोरा फतेही सारखी फिगर हवी म्हणून बायकोला तासंतास करायला लावली जीम.... बायकोचे झाले हे हाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सिम्बायोसिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट’चे उद्घाटन

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software