- Hindi News
- सातारा
- बिजवडी केंद्रातील सर्व शाळांचे वारुगड दर्शन विद्यार्थ्यांनी लुटला वर्षा सहलीचा आनंद
बिजवडी केंद्रातील सर्व शाळांचे वारुगड दर्शन विद्यार्थ्यांनी लुटला वर्षा सहलीचा आनंद

By Lokprant
On
दहिवडी: माण तालुक्यातील बिजवडी केंद्रातील सर्व शाळांनी मिळून परिसरातील ऐतिहासिक किल्ले वारुगड येथे श्रावणी सहलीचे आयोजन केले होते. यावेळी केंद्रसमूहातील बिजवडी, राजवडी,पाचवड,अनुभूलेवाडी, हस्तनपूर,गेंदवाडा,गोसावीवाडी,येळेवाडी,पिंपराळे,पांगरी, हणमंतमाळ,लोखंडेवस्ती या शाळांनी सहभाग घेतला. सर्व विद्यार्थी,शिक्षक यांनी गडावर जाऊन पुरातन काळातील अनेक गोष्टी अनुभवल्या.
यावेळी किल्ले वारुगडचे ऐतिहासिक महत्व,गडावरील बालेकिल्ला, विहीर, मंदिर, प्रवेशद्वार, शेकडो वर्षांपूर्वीपासून कमी आधारावरही विस्तारलेला वटवृक्ष याबाबत तात्याबा भोसले यांनी माहिती सांगितली.गडावर विद्यार्थ्यांनी शिवपराक्रमचे पोवाडे गायले.गडावरून दिसणाऱ्या हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा,माण आणि फलटण तालुक्यातील विविध भागातील गावांचे विहंगम दृश्य पाहून सर्वजण हरकून गेले. नंतर परिसरातील भैरवनाथाच्या मंदिरात दर्शन घेत सर्वांनी सामुदायिक जेवणाचा आनंद लुटला.
यानंतर विद्यार्थ्यांनी आनंददायी खेळ,ग्रुप डान्स व देशभक्तीपर गीते यांचे सादरीकरण केले.सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी यात सहभागी होत आपले कलागुण दाखविले. पुंडलिक खराडे,महेंद्र अवघडे,महादेव दडस,अशोक यलमर,नलिनी सोनवलकर,दिलीप गंबरे,शिल्पा निंबाळकर,कल्पना पाटोळे,प्रकाश बोराटे,धनाजी लोखंडे, स्वाती साळवे, प्रकाश शिंदे, विजया डफळ, वैशाली अवघडे, शोभा शिंदे,आशा जाधव,अंजली गाडे यांनी विविध उपक्रम घेऊन मुलांना निखळ आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
श्रावण महिन्यातील विलोभनीय वातावरण,विद्यार्थ्यांचा उत्फूर्त प्रतिसाद आणि शिक्षकांनी घेतलेला सहभाग यामुळे विद्यार्थ्यांनी इतिहासाचे धडे गिरवत निसर्गाचा मनमुराद आनंद लुटल्याने ही वर्षा सहल संस्मरणीय ठरली.
Edited By: Lokprant
खबरें और भी हैं
विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार
By Lokprant
Latest News
24 Aug 2025 14:46:31
कोल्हापूर: राजेबागस्वर फुटबॉल क्लबच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शनिवारी संध्याकाळी सिद्धार्थनगर...