- Hindi News
- सातारा
- प्रकाश बनकरची जबरदस्त कामगिरी ! हरियाणाच्या कुमार केसरी मल्लांला लोळवल
प्रकाश बनकरची जबरदस्त कामगिरी ! हरियाणाच्या कुमार केसरी मल्लांला लोळवल

By Lokprant
On
दहिवडी: माण तालुक्यातील पळसावडे येथील श्री सिध्दनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर याने हरियाणाचा कुमार केसरी पै.विरेंद्र कुमार यास आस्मान दाखवत मानाची ट्रॉफी आणि दोन लाख रूपयांचे बक्षीस जिंकले. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी कॅबिनेट मंत्री महादेवराव जानकर यांच्या हस्ते प्रकाश बनकरला बक्षीस दिले. पळसावडे मैदानात कुस्तीचा थरार रंगला होता. यावेळी अनेक चटकदार आणि प्रेक्षणीय कुस्त्यांचा आनंद प्रेक्षकांनी घेतला.
द्वितीय क्रमांकाची कुस्ती कुमार केसरी विक्रम भोसले व प्रशांत जगताप यांच्यामध्ये झाली. विक्रम भोसलेने प्रशांत जगतापला चितपट केले. त्यास अभयसिंह जगताप व अनिल देसाई यांच्या तर्फे १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस दिले. तिसऱ्या क्रमांकाची कुस्तीत सनि मदनेने प्रसाद सुळवर विजय मिळवला त्यास उद्योजक अंकुशभाऊ गोरे व दत्ताशेठ शेळके यांच्या तर्फे १ लाख २५ हजार रुपयांचे बक्षीस दिले. चौथ्या क्रमांकाची कुस्तीत नाथा पवारने ओम मानेला आस्मान दाखवले त्यास पीएसआय सिध्दनाथ शेंडगे, मनोज शेंडगे व किरण शेंडगे यांच्या तर्फे १ लाख १० हजार रुपयांचे बक्षीस दिले. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत दत्ता बोडरेने प्रथमेश पाटीलवर विजय मिळवला त्यास सर्जेराव व्हरकाटे, विलास बाबर, दिपक बाबर, भानुदास बाबर यांच्या तर्फे १ लाख रुपयांचे बक्षीस दिले. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत सचिन काळेने विनायक दिडवाघवर विजय मिळवला त्यास सरपंच ॲड. विलास चव्हाण व उपसरपंच आबासाहेब सरतापे यांच्या तर्फे १ लाख रुपयांचे बक्षीस दिले. सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत संग्राम चव्हाणने निकेतन पाटीलवर विजय मिळवला त्यास दत्ता शेठ जाधव यांच्या तर्फे १ लाख रुपयांचे बक्षीस दिले. त्याच या कुस्ती मैदानात डोळ्यांचे पारणे फेडण्या सारख्या अनेक चटकदार कुस्त्या झाल्या. सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक परशुराम पवार व सोमनाथ दडस यांनी निवेदक म्हणून काम पाहिले.
Edited By: Lokprant
खबरें और भी हैं
विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार
By Lokprant
Latest News
24 Aug 2025 14:46:31
कोल्हापूर: राजेबागस्वर फुटबॉल क्लबच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शनिवारी संध्याकाळी सिद्धार्थनगर...