- Hindi News
- सातारा
- नरवणेत सुवर्ण महोत्सवी पारायण सोहळ्यानिमित्त दहीहंडीचा थरार
नरवणेत सुवर्ण महोत्सवी पारायण सोहळ्यानिमित्त दहीहंडीचा थरार

By Lokprant
On
नरवणे येथे अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली. या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त दरसाल प्रमाणे दहीहंडीचा थरार पाहायला मिळाला.तीन ठिकाणी चार माळे लावून गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्यात आल्या. संपूर्ण भक्तीमय वातावरणात 8 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट अखेर हा सोहळा संपन्न झाला. या ज्ञानयज्ञात ह. भ. प. विठ्ठल स्वामी, सोपान महाराज काळे, कृष्णात महाराज कोळे, देवव्रथ राणू मालक वासकर, परशुराम महाराज वाघ, आनंद महाराज जाधव, यांनी प्रवचन सेवा केली. या पारायण सोहळ्यात ह. भ. प. ऋषिकेश वासकर महाराज, बापूसाहेब महाराज देहूकर, योगेश महाराज जाधव, माधव महाराज नामदास, उमेश महाराज दशरथे, पांडुरंग महाराज घुले, महादेव महाराज राऊत, ज्ञानेश्वर महाराज जोगदंड, युवक मित्र बंडातात्या कराडकर, यांनी कीर्तन सेवा केली . या ज्ञानेश्वरी पारायणा साठी 425 ज्ञानेश्वरी वाचक होते. या पारायण सोहळ्याला अनेक ग्रामस्थांनी ,मुंबई, पुणेकरांनी कीर्तन, प्रवचन सौजन्य साठी योगदान दिले .अनेक दानशूर व्यक्तींनी अन्नदानासारखे महान कार्य केले. आम्ही वारकरी पैठणी व सन्मानाचे मानकरी हा उपक्रम राबवला. ज्ञानेश्वरी वरती वाचकांची परीक्षा घेतली त्या विजेत्यांना तुकाराम गाथा भेट दिली .सूर्यकांत शंकर काटकर यांनी 250 ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचकांसाठी मोफत दिले. अनिल भाऊ देसाई यांनी मंडप सौजन्य दिले. गोपाळकाल्या दिवशी काल्याच्या किर्तनानंतर भव्य दिव्य माऊलींचा दिंडी सोहळा हजारों भाविक भक्तांच्या उपस्थितीत निघाला .सर्वांना महाप्रसादाचा लाभ घेतला .अशा आनंदमय, भक्तीमय, ज्ञानोबा तुकाराम नाम गजरात सर्वांच्या तन मन धनाच्या योगदानाने हा पारायण सोहळा संपन्न झाला अशी माहिती मनोहर काटकर सर यांनी दिली.
Edited By: Lokprant
खबरें और भी हैं
विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार
By Lokprant
Latest News
24 Aug 2025 14:46:31
कोल्हापूर: राजेबागस्वर फुटबॉल क्लबच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शनिवारी संध्याकाळी सिद्धार्थनगर...