- Hindi News
- सातारा
- वेदावती हायस्कूलच्या मैदानाची त्रिमुर्ती उद्योग समूहाकडून स्वच्छता
वेदावती हायस्कूलच्या मैदानाची त्रिमुर्ती उद्योग समूहाकडून स्वच्छता

दहिवडी: त्रिमूर्ती उद्योग समूह मार्डी यांच्याकडून खटाव तालुक्यातील खातगुण येथील वेदावती हायस्कूल शाळेसमोर पावसामुळे शाळेच्या मैदानात वाढलेली झुडपे काढून स्वच्छता करण्यात आली. संत सेना महाराज पुण्यतिथी दरवर्षी नवनवीन उपक्रमाने साजरी करण्यात येते, यावर्षी त्रिमूर्ती उद्योग समूह माधव राऊत यांच्येकडून खटाव तालुक्यातील खातगुण येथील वेदावती हायस्कूल शाळेसमोर पावसामुळे शाळेच्या मैदानात गवत व बरीच झाडे झुडपे वाढलेली होती. मुलामुलींना मैदानावर व्यवस्थित खेळता व फिरता येत नव्हते त्या शाळेतील शिक्षक देवानंद कांबळे यांनी शाळेची परिस्थिती त्यांना सांगितली व शाळेला सहकार्य करण्याचे आवाहन केले,त्यामुळे त्रिमूर्ती उद्योग समूह माधव राऊत यांचे कडून जेसीबीच्या साह्याने सर्व मैदान परिसर स्वच्छ करण्यात आला. माधव राऊत यांना शिर्डी साईबाबा येथे श्री साई इंटरनॅशनल अवॉर्ड 2025 मिळाल्याबद्दल वेदावती हायस्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले व शाळेला सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. त्रिमूर्ती उद्योग समूहाच्या वतीने असे बरेच सामाजिक वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असतात. श्री साई इंटरनॅशनल अवॉर्ड 2025 मिळाल्याबद्दल त्यांचे माण खटाव चे नेते मा. शेखरभाऊ गोरे,मा.संदिपदादा पोळ, दहिवडी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष सौ.सुरेखाताई पखाले, मुंबई घाटकोपर नगरसेवक मा. सुर्यकांत गवळी, देवानंद कांबळे सर, ग्रामसेवक सतिश भोसले,सामाजिक कार्यकर्ते बापूराव चव्हाण, बाळासाहेब राऊत,चंदु पोळ, योगेश पोळ, इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन केले.